PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

Raj Thackeray & Narendra Modi
Raj Thackeray & Narendra Modiesakal

Loksabha election 2024 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त एका मंचावर येणार आहे. दोन्ही नेते एकत्र येणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचार केला होता. त्यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'ची भरपूर चर्चा झाली होती. मात्र यावेळी २०२४ मध्ये राज ठाकरे यांनी भाजपला अर्थात महायुतीला पाठिंबा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला पाठिंबा देत आहोत, असं म्हणत राज यांनी भूमिका बदलली. चार दिवसांपूर्वी त्यांनी नारायण राणे यांच्या समर्थनार्थ कणकवली येथे जाहीर सभा घेतली होती. त्यात त्यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक केलं होतं.

आता राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहे. येत्या १७ मे रोजी मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे आयोजित सभेला हे दोन्ही नेते संबोधित करतील.

मोदी आणि ठाकरे यांच्या सभेबाबत मनसेचे प्रवक्ते वागीश सारस्वत यांनी माहिती दिली आहे. ही सभा १७ मे रोजी होणार असून त्यापूर्वी १० आणि १२ मे रोजी अनुक्रमे पुणे आणि ठाणे जिल्ह्यात राज यांचे मेळावे होणार आहेत. तर २० मे रोजी मुंबई आणि ठाण्यातील जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १७ मे रोजीच्या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, मनसेच्या या सभेला नगरविकास विभागाने परवानगी दिली आहे. परवानगी मनसेला मिळाली असली तरी एनडीएची जाहीर सभा होणार आहे. सभेच्या परवानगीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील अर्ज केला होता.

पंतप्रधानांचा रोड शो

15 मे रोजी नरेंद्र मोदी यांचा ईशान्य मुंबईत रोड शो असेल. महायुतीच्या बैठकीत तसा निर्णय झाला आहे. रोड शोचा रूट हा 15 किलोमीटरचा असणार आहे. तसेच 17 तारखेला शिवाजी पार्कला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होईल.

बुधवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत दीड लाखांच्या सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी नियोजन करा, असे आदेश देण्यात आलेत. सभेच्या आणि रोड शोच्या नियोजनासाठी एक कमिटी तयार करण्यात येणार आहे. येणाऱ्या लोकांना येण्या-जाण्याची सोय करण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com