Anand Paranjape : मनसेचे राष्ट्रवादी स्वागत करेल

मनसेची विचारसरणी, धेय्यधोरणे ही भाजपशी मिळतीजुळती आहेत. लोकसभा जागावाटपाचा योग्य निर्णय, प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा लढायला मिळतील.
Anand Paranjape
Anand Paranjapesakal

ठाणे - मनसेची विचारसरणी, धेय्यधोरणे ही भाजपशी मिळतीजुळती आहेत. लोकसभा जागावाटपाचा योग्य निर्णय, प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा लढायला मिळतील. ४५ प्लस जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणे हा संकल्प आहे.

अशातच महायुतीत मनसे जत सामील होत असेल तर, राष्ट्रवादी त्याचे स्वागत करेल असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले. तसेच मनसे महायुतीमध्ये सामील झाल्यास, ठाणे, भिवंडी, कल्याण, पालघर आदी जागांवर, महायुतीतील उमेदवारांना त्याचा नक्कीच फायदा होणर असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत नुकतीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुंबई येथील ताज लॅण्ड इन हॉटेल येथे बैठक झाली. या बैठकीतून मनसेची महायुतीमधील समावेशाची अधिकृत घोषणा महायुतीचे नेते लवकरच करतील.

मनसे जर महायुतीमध्ये आली तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचे स्वागतच करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ४५ प्लस लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी जे जे घटक पक्ष एनडीए मध्ये येतील, त्यांचे स्वागतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल, असे आनंद परांजपे यांनी सांगितले. महायुतीतील सर्व राजकीय नेत्यांमध्ये समन्वय आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीनही नेते बसून जागावाटपाचा योग्य निर्णय घेतील आणि प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक लोकसभेच्या जागा लढायला मिळतील. आता एकच लक्ष आहे की मनसेचे महायुतीमध्ये सामिल झाल्यानंतर ४५ प्लस लोकसभेच्या जागा या महाराष्ट्रातुन निवडून द्यायच्या आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण या तीनही लोकसभेच्या जागा व पालघर जिल्ह्यातील एक जागा यावर मनसेचा, महायुतीतील सहभागाबद्दल महायुतीतील उमेदवाराला फायदाच होईल. स्वप्न कधी साकार होतात कधी भंगही पावतात. विधानसभा निवडणूक अद्याप सहा महिने दूर आहे. ज्यावेळी विधानसभेची निवडणूक येईल, त्यावेळची राजकीय परिस्थिती त्यावेळेला कशी असेल त्यापद्धतीने वाटाघाटी होतील.

आता महायुती समोर लक्ष्य आहे, येणाऱ्या पाच टप्यामधील महाराष्ट्रामधील ४८ लोकसभेच्या जागा, या ४८ जागांमधील ४५ प्लस जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणे हा सर्वात पहिला संकल्प महायुतीतील नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली.

मुंबईला प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, शिवतारे या विषयाला फार महत्व देऊ नका. मुख्यमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतील. एकाने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरु मारायचे नसते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ही राजकीय प्रगल्भता आहे. कुठला विषय कुठर्यंत ताणायचा आणि कुठला विषय कधी सोडून द्यायचा. महायुतीला कुठल्याही प्रकारचे नुकसान होईल असे कुठलेही वक्तव्य किंवा कृत्य राष्ट्रवादी काँग्रेसकडून घडणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com