Madha Loksabha : महादेव जानकर-संजीवराजेंमध्ये कमराबंद चर्चा; अर्धा तासाच्या गुफ्तगूत रघुनाथराजेही सोबत, भेटीत काय घडलं?

महादेव जानकर यांनी येथे कार्यकर्ता मेळावा घेऊन स्वतःची उमेदवारी माढा व परभणी लोकसभा मतदारसंघातून जाहीर केली होती.
Madha Loksabha Constituency
Madha Loksabha Constituencyesakal
Summary

'रामराजे यांनी मला मायेचं प्रेम दिले. त्यांचा व माझा पक्ष वेगवेगळा आहे; पण मी धाकटा भाऊ म्हणून याठिकाणी आशीर्वाद मागायला आलो आहे.'

फलटण शहर : माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Loksabha Constituency) उमेदवारी जाहीर केलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी धक्कातंत्राचा अवलंब करीत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर (Sanjivraje Naik-Nimbalkar) यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्याशी व बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक- निंबाळकर यांच्याशी त्यांनी कामरबंद चर्चाही केली. मात्र, ही भेट वैयक्तिक असल्याचे श्री. जानकर यांनी सांगितले.

महादेव जानकर यांनी येथे कार्यकर्ता मेळावा घेऊन स्वतःची उमेदवारी माढा व परभणी लोकसभा मतदारसंघातून जाहीर केली होती. महायुतीशी (Mahayuti) फारकत घेत ते महाघाडीच्या नेत्यांबरोबर वेळोवेळी दिसून आले होते. कुणी काही म्हणूद्यात आपण लोकसभा लढवणारच व जिंकूनही येणार, अशी गर्जना करीत त्यांनी माढ्यातून शड्डू ठोकला होता. नुकतीच त्यांची व शरद पवार यांची बैठक झाली होती; परंतु या बैठकीतून ते तडकाफडकी निघून गेल्याचीही चर्चा होते.

Madha Loksabha Constituency
Kolhapur Loksabha : शामराव माळी यांचं 'घोडा' चिन्ह अन् काँग्रेस उमेदवाराचा फक्त 165 मतांनी झाला पराभव

या पार्श्वभूमीवर श्री. जानकर यांनी आज येथे संजीवराजे व रघुनाथराजे यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास त्यांनी कमराबंद चर्चाही केली. बाहेर आल्यानंतर औपचारिकपणे बोलताना त्यांनी सांगितले की, श्रीमंत मालोजीराजे हे पहिले मंत्री होते. माझे आजोबा, आई व वडिलांनी त्यांना त्यावेळी मतदान दिले आहे. त्यामुळे मालोजीराजे यांच्यावर संजीवराजे व रघुनाथराजे यांचाच हक्क नसून आमचाही हक्क आहे.

Madha Loksabha Constituency
साताऱ्यासाठी शरद पवारांचा 'गेम प्लॅन'; महायुतीच्या उमेदवारावर ठरणार पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार, सस्पेन्स वाढला

रामराजे यांनी मला मायेचं प्रेम दिले. त्यांचा व माझा पक्ष वेगवेगळा आहे; पण मी धाकटा भाऊ म्हणून याठिकाणी आशीर्वाद मागायला आलो आहे. आजची माझी भेट ही वैयक्तिक व आशीर्वाद मागण्यासाठी आहे. पुढील काळात काय करायचे ते आम्ही करूच, असेही जानकर यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com