Satara Lok Sabha : जनतेनं ठरवलंय उदयनराजेच खासदार, आजचा फक्त 'ट्रेलर' तर मतदानादिवशी दिसणार 'पिक्चर' - CM शिंदे

आज जमलेल्या जनसमुदायावरून जनतेने उदयनराजेंना (Udayanraje Bhosale) प्रचंड मतांनी विजयी करायचं ठरवलंय.
Mahayuti BJP candidate Udayanraje Bhosale
Mahayuti BJP candidate Udayanraje Bhosaleesakal
Summary

खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत सातारा लोकसभेसाठी (Satara Lok Sabha) उमेदवारी अर्ज दाखल केला.

सातारा : आज जमलेल्या जनसमुदायावरून जनतेने उदयनराजेंना (Udayanraje Bhosale) प्रचंड मतांनी विजयी करायचं ठरवलंय. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्धार आणि संकल्प सातारकरांनी केलेला आहे. महायुतीचे चार आमदार आहेत. आजचा ट्रेलर आपण बघितला. मतदानादिवशी पूर्ण पिक्चर पाहायला मिळेल, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदयनराजे विजयी होतील, असा विश्वास आज येथे व्यक्त केला.

खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत सातारा लोकसभेसाठी (Satara Lok Sabha) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. उदयनराजेंची रॅली पोवई नाक्यावर पोचत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई हे तेथे दाखल झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

Mahayuti BJP candidate Udayanraje Bhosale
Satara Lok Sabha : साताऱ्यात शिवेंद्रराजेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; उदयनराजेंबाबत नाराजी, शिंदेंना मिळणार सहानुभूती?

त्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी उदयनराजेंसोबत ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. अर्ज दाखल करताना श्री. शिंदे, श्री. फडणवीस, श्री. पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, महेश शिंदे, जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर श्री. शिंदे व श्री. फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, ‘‘आज अर्ज दाखल करण्यासाठी जमलेल्या जनसमुदायावरून जनतेने उदयनराजेंना विजयी करायचे ठरवल्याचे स्पष्ट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प सातारकरांनी केल्याचे दिसते. त्यामुळे उदयनराजे प्रचंड मतांनी निवडून येतील.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जिल्ह्यात सभा होणार असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘सभा घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे चार आमदार आहेत. अन्य दोन विधानसभा मतदारसंघांतही महायुतीची ताकद आहे. लोकांचा प्रतिसाद पाहिला. हजारो लोक भर उन्हात आले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी लोक उदयनराजेंना निवडून देतील.’’ आजचे शक्तिप्रदर्शन हा ट्रेलर आहे. मतदानादिवशी पूर्ण पिक्चर बघा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

Mahayuti BJP candidate Udayanraje Bhosale
Sangli Lok Sabha : 'विशाल पाटलांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करा'; संजय राऊतांची आक्रमक भूमिका

आम्ही फिल्डवर काम करणारे

घरी बसणाऱ्यांना, फेसबुक लाइव्ह करणाऱ्यांना लोक मतदान करणार, की ‘फेस टू फेस’ भेटणाऱ्यांना हा प्रश्न आहे. आमचे सरकार फिल्डवर काम करणारे आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहे.

राज्यात ४५ जागा जिंकू : मुख्यमंत्री

अनेक वर्षांत कामे झाली नाहीत, ती राज्य सरकारने दोन वर्षांत केली. ५०-६० वर्षांत काँग्रेसला जे जमले नाही, ते मोदींनी दहा वर्षांत केले. मोदींनी ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले. त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकरी, गरीब, युवा व महिलांवर फोकस आहे. सर्वसामान्यांना रोटी, कपडा, मकान द्यायचे त्यांचे ध्येय आहे. त्यामुळे देशात मोदी लाट निर्माण झाली आहे. राज्यात आम्ही पाहतोय. पहिल्या फेरीत विदर्भात ४५ डिग्री तापमान असताना लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. त्यामुळे आम्ही राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणा, असा विश्‍वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

Mahayuti BJP candidate Udayanraje Bhosale
'मी शाहू विचारांबरोबर!' 17 माजी महापौरांसह 228 माजी नगरसेवकांचा शाहू महाराजांसोबत राहण्याचा निर्धार

‘चारशे पार’मध्ये उदयनराजेही : फडणवीस

मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याचा आग्रह केला. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. उदयनराजे चांगल्या मतांनी निवडून येतील. भाजपच्या ‘४०० पार’मध्ये उदयनराजे हे मोदींसोबत साताऱ्यातून असतील, याची मला खात्री आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com