घटक पक्षांमुळेच बारणेंची बाजी

शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर मावळ मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कौल देणार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ देणार, हे पाहणे महत्त्वाचे होते.
maval lok sabha constituency shrirang barne dominance winner mahayuti
maval lok sabha constituency shrirang barne dominance winner mahayutiSakal

-जयंत जाधव

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा गड राखत खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘हॅट्‌ट्रिक’ मिळविली आणि भाजप व राष्ट्रवादीसोबतच्या नव्या समीकरणांनंतरही यश मिळवले. उरण व कर्जत वगळता बारणे यांना अन्य चार विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले.

अपेक्षेप्रमाणे चिंचवड व पनवेल या भाजपच्या शहरी मतदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांनी बारणे यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले. तर; शेकापचे मताधिक्य असलेल्या घाटाखालील उरण व कर्जत या मतदारसंघांनी वाघेरे यांना मताधिक्य दिले.

शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर मावळ मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कौल देणार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ देणार, हे पाहणे महत्त्वाचे होते. कारण यावेळी शिवसेनेची व राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद विभागलेली होती. परंतु, महायुतीतील तीनही पक्षाचे सहाही मतदारसंघांमध्ये आमदार होते.

यामध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, अश्‍विनी जगताप, अपक्ष महेश बालदी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अण्णा बनसोडे व सुनील शेळके आणि कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे अशी साथ बारणे यांना अनुकूल होती. तरी तुलनेत नवख्या असलेल्या वाघेरे यांनी बारणे यांना चांगलीच टक्कर दिली.

प्रकल्पांना गती नाही

मागील वेळी बारणे यांनी पार्थ पवार यांच्या विरोधात दोन लाख १५ हजार ९१३ मतांनी विजय मिळवला होता. तर, बारणे यांना वाघेरे यांच्या विरोधात ९६ हजार ६१५ मताधिक्य मिळाले. दोनदा खासदारपद भूषविलेल्या बारणे यांच्याबद्दल काहीशी नाराजी असल्यामुळे मताधिक्य घटले.

दोनदा संधी मिळूनही बारणे यांना रेल्वेचे चौपदरीकरण, रेडझोनची हद्द कमी करणे, पिंपरी-चिंचवड व पनवेल या मोठ्या शहरांना सुरळीत व नियमित पाणीपुरवठा करून देणे, पनवेल येथील नयना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणे, पनवेल येथे पासपोर्ट कार्यालय सुरू करणे अशा कामांमध्ये आलेले अपयश, वाढती बेरोजगारी व महागाई या मुद्यांमुळेही बारणे यांचे मताधिक्य घटले.

वाघेरे यांनी संधी हुकवली

घाटाखाली बारणे यांना पनवेलमधून मागील वेळी ९६ हजारांपर्यंत मताधिक्य होते. यावेळी त्यांना पनवेलमध्ये ३१ हजार ३८ एवढेच मताधिक्य मिळाले. घाटाखाली शेकापची ताकद हा वाघेरे यांना महाविकास आघाडीतील तीन पक्षांव्यतिरिक्त मिळालेला बूस्टर डोस होता. त्यामुळेच त्यांना कर्जतमध्ये १७ हजार ६६० व उरणमध्ये १३ हजार २५० मताधिक्य मिळाले.

राज्यातील पक्षफुटीनंतर याही मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असलेल्या सहानुभूतीचा फायदा वाघेरे यांना घेता आला नसल्याचे दिसते. वाघेरे यांची वैयक्तिक कार्यकर्त्यांची व अन्य ‘यंत्रणा’ काही प्रमाणात कमी पडली. स्वत:च्या पिंपरी मतदारसंघात मताधिक्य मिळविण्यात वाघेरे अपयशी ठरले. एकट्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांना ७४ हजार ७६५ व पनवेल विधानसभा मतदारसंघात ३१ हजार ३८ मताधिक्य आहे.

मावळात मतांचे विभाजन

मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके व त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे माजी मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे हे दोन्ही यावेळी एकत्र होते. ते बारणे यांच्यासोबत असताना केवळ चार हजार ९३५ मताधिक्य मिळाले. त्यामुळे मावळात कोणी काम केले? वा मतांचे विभाजन झाले, हेच निकालावरून दिसून येते.

  • ९६,६१५ मतांनी विजय मिळवून श्रीरंग बारणे यांची हॅट्‍ट्रिक

  • केवळ आठव्या फेरीत वाघेरे यांना १,६४० मतांची आघाडी

  • २५ पर्यंतच्या प्रत्येक फेरीत बारणेंना दहा हजारांची आघाडी

  • माधवी जोशी २७,७६८ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर

  • चौथ्या क्रमांकांची १६,७६० मते ‘नोटा’ला

  • टपाली मतदानातही बारणेंची ५१ मतांची आघाडी

  • दहाव्या फेरीनंतर आकडेवारीस दोन तासांचा विलंब

  • विधानसभांची मतमोजणी टॅली करण्याच्या ॲपमध्ये एरर

  • वाघेरे यांना उरण विधानसभा मतदारसंघातून १३,२५०

  • बारणे यांना पनवेल (३१,०३८), मावळ (४,९३५), चिंचवड (७४,७६५) व पिंपरी (१६,७३१)

मावळ लोकसभा

श्रीरंग बारणे (शिवसेना) - ६,९२,८३२ मिळालेली मते ( ९६,६१५ मताधिक्य)

संजोग वाघेरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) - ५,९६,२१७ मिळालेली मते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com