मनसे-भाजप युतीची ‘यूपी’त चर्चा

महाराष्ट्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षशी अद्याप प्रत्यक्षात आली नसली तरी उत्तर प्रदेश (यूपी) आणि बिहारमधील सत्ताधारी पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर या संभाव्य युतीचा कसा परिणाम होईल, याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
MNS-BJP alliance effect in UP lok sabha election politics
MNS-BJP alliance effect in UP lok sabha election politicsSakal

लखनौ : महाराष्ट्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षशी अद्याप प्रत्यक्षात आली नसली तरी उत्तर प्रदेश (यूपी) आणि बिहारमधील सत्ताधारी पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर या संभाव्य युतीचा कसा परिणाम होईल, याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजप व मनसे एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होण्यामागचे कारण सहज समजण्यासारखे आहे. राज ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी राहणाऱ्या ‘यूपी’ आणि बिहारी जनतेला लक्ष्य करीत त्यांच्याविरोधात सातत्याने आंदोलनाची भाषा केली आहे.

‘यूपी’ - बिहारच्या ‘भैय्या’ ची खिल्ली उडविणाऱ्या राज ठाकरे यांची जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. गरिबीमुळे उपजीविकेच्या शोधात देशाची राजधानी मुंबईत स्थलांतरित होणाऱ्या लोकांबद्दलच्या राज ठाकरे यांच्या भावना जुन्या व्हिडिओतून व्यक्त होत आहेत.

विरोधकांसाठी प्रचाराचा मुद्दा

उत्तर प्रदेश (यूपी) आणि बिहारमधील स्थलांतरितांविरोधात असलेल्या पक्षांशी भाजप हातमिळवणी करणार असल्याच्या मुद्दा मतदारांपुढे आक्रमकपणे मांडण्यासाठी ‘यूपी’मधील काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आणि बिहारमधील राष्ट्रीय जनता पक्ष (आरजेडी) यांसह विरोधी पक्षांनी प्रचाराची योजना आखली आहे. पण यामुळे दोन राज्यांमध्ये भाजपचे किती नुकसान होऊ शकते, हा वादाचा मुद्दा आहे.

भाजपमध्येही चिंता

भाजप- मनसेची संभाव्य युती हा उत्तर प्रदेशमधील भाजपच्या वर्तुळातही चिंतेचा विषय ठरत आहे. राज ठाकरे यांना बरोबर घेणे भाजपला का महत्त्वाचे वाटत आहे, अशा प्रश्‍न येथे पक्षात विचारला जात आहे.

‘‘महाराष्ट्रातील राजकारणात राज ठाकरे यांचे सध्या काय स्थान आहे, हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे,’’ असे मत लखनौमधील भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्यांचा आधार असलेले पूर्व ‘यूपी’तील आणखी एक प्रमुख नेत्याच्या म्हणण्यानुसार राज यांच्या पक्षाने महाराष्ट्रात विधानसभेच्या अनेक जागा जिंकल्या असतील,

परंतु त्यापैकी काहींनी बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असलेले उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा दाखविली. आता उद्धव ठाकरे हे ‘इंडिया’ आघाडीचा भाग आहेत. अशा वेळी महाराष्ट्रात राज ठाकरे यांचा भाजपला कसा फायदा होईल, हे समजत नाही. उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या ८० पैकी ८० जागा जिंकण्याचा दावा भाजपचे नेते करीत असताना राज यांना बरोबर घेतल्यास ‘यूती’तील भाजपच्या कामगिरीवर परिमाण होऊ शकतो, असे सार्वत्रिक मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com