Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

घटनेतील आरक्षण काढून टाकायचं असतं, तर ते आम्‍ही मागील दहा वर्षांत करू शकलो असतो.
Modi Govt constitution
Modi Govt constitutionesakal
Summary

''पंतप्रधान मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी संसदेला दंडवत घातला होता. त्‍यामुळे संविधान बदलणं, आरक्षण कमी करणं, असा कोणताही इरादा नाही.’’

कणकवली : आम्‍हाला संविधान (Constitution) बदलायचं असतं, घटनेतील आरक्षण काढून टाकायचं असतं, तर ते आम्‍ही मागील दहा वर्षांत करू शकलो असतो. काँग्रेसला (Congress) जे ४० वर्षांत जमलं नाही ते मोदींनी (Narendra Modi) दहा वर्षांत करून दाखवले, असे प्रतिपादन चिमूरचे खासदार तथा भाजप आदिवासी आघाडीचे राष्‍ट्रीय सरचिटणीस अशोक नेते यांनी येथे केले. श्री. नेते यांनी प्रहार भवन येथे महायुतीच्यावतीने पत्रकार परिषद घेतली.

त्‍यांच्यासोबत भाजप जिल्‍हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्‍हाप्रमुख संजय आंग्रे, मनसेचे धीरज परब, नामदेव जाधव, अबिद नाईक, रमाकांत जाधव, राजू राऊळ आदी उपस्थित होते. श्री. नेते म्‍हणाले, ‘‘भाजपने चारशे पार जागा जिंकल्या, तर ते संविधान बदलतील, आरक्षण काढून टाकतील, अशी टीका काँग्रेस आणि त्‍यांच्या आघाडीमधील नेते करत आहेत. आम्‍हाला तसं करायचं असतं, तर मागील दहा वर्षांतच केलं असतं. कारण आमच्याकडे बहुमत आहे. पण, आम्‍ही संविधानाचे पाईक आहोत.

पंतप्रधान मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी संसदेला दंडवत घातला होता. त्‍यामुळे संविधान बदलणं, आरक्षण कमी करणं, असा कोणताही इरादा नाही.’’ ते पुढे म्‍हणाले, ‘‘गरिबी हटावसह देशभरातील जनतेच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष काहीही करू शकला नाही. मात्र, काँग्रेसला जे चाळीस वर्षांत करता आलं नाही, ते मोदींनी दहा वर्षांत करून दाखवलं. अनेक योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवल्या. त्‍याच पाठबळावर आम्‍ही चारशे पारचा नारा देत आहोत.’’

Modi Govt constitution
Chikkodi Lok Sabha : 370 कलम हटवून मोदींनी देशातील दहशतवाद संपविला, 70 वर्षांत काँग्रेसनं काय केलं? अमित शहांचा सवाल

मालवणात राणेंचा प्रचार

मालवण : भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लोकसभा उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. देऊळवाडा श्री देव रामेश्वर मंदिर, श्री नारायण मंदिर तसेच परिसरातील देवालयांत श्रीफळ ठेवून राणे यांच्या विजयाचे साकडे घालण्यात आले. भरड दत्त मंदिर येथेही श्रीफळ ठेवून मालवण शहर बाजारपेठ येथे प्रचाराला सुरुवात केली. भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, हरीश गावकर, महेश सारंग, आप्पा लुडबे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com