Narendra Modi : पुण्याला काहीच नाही उणे! ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभेत ‘गॅरंटी’

पुण्यातील लोक बुद्धिमान आहेत. गेल्या दहा वर्षांत पुण्याचे रूप बदलत आहे. मेट्रो, विमानतळाचे विस्तारीकरण, प्रशस्त पालखी मार्ग तसेच समृद्धी महामार्ग, वंदे भारत रेल्वे, अशी सर्व आधुनिक भारताची प्रतिमा पुण्यात दिसत आहे.
Narendra Modi
Narendra Modisakal

पुणे : “पुण्यातील लोक बुद्धिमान आहेत. गेल्या दहा वर्षांत पुण्याचे रूप बदलत आहे. मेट्रो, विमानतळाचे विस्तारीकरण, प्रशस्त पालखी मार्ग तसेच समृद्धी महामार्ग, वंदे भारत रेल्वे, अशी सर्व आधुनिक भारताची प्रतिमा पुण्यात दिसत आहे. पुणेकरांनो, तुम्ही लिहून घ्या, महाराष्ट्राला ही मोदीची गॅरंटी आहे की, तुम्ही देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास करणार,” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची गॅरंटी सोमवारी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या उल्लेखाने केली. पुण्याने अनेक सुधारक देशाला दिले आहेत. आज ही भूमी जगाला चांगले शास्त्रज्ञ, उद्योजक देत आहे. पुणे जितके प्राचीन, तितकेच भविष्याचा वेध घेणारे शहर आहे. पुण्यात प्रत्येक क्षेत्राचे तज्ज्ञ आहेत. त्यामुळेच ‘पुणे तिथे काय उणे’, असे म्हणत त्यांनी पुण्याची महती विशद गेली.

महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पुण्यातील रेसकोर्सवर आयोजित सभेत मोदी बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह शहर भाजपचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

Narendra Modi
Loksabha election 2024 : सातारा, सोलापूरच्या पाणीटंचाईचे काय? पंतप्रधानांना काँग्रेसचा प्रश्न

मोदी म्हणाले, “केंद्र सरकारच्या नवीन धोरणाचा थेट परिणाम पुण्यासारख्या शहरातील महत्त्वाकांक्षी तरुणांवर होत आहे. मॅपिंगच्या क्षेत्रात तरुण आघाडीवर आहेत. अवकाश संशोधन, संरक्षण साहित्याचे उत्पादन, संशोधन विभाग, नावीन्यपूर्ण उद्योग अशा विविध क्षेत्रांत पुणे प्रगती करत आहे. पुण्यात बुद्धिमान तरुण आहेत, त्यामुळे केंद्राने नवनिर्मितीला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरुणांना ती डोळे झाकून देण्याचा निर्णय घेतला आहे.”

पुणे हे वाहन उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. दहा वर्षांपूर्वी भारतात मोबाईल आयात करावे लागायचे. पण भारत आज जगातला दुसरा सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे. पुण्यात उत्पादित झालेल्या ‘मेड इन इंडिया’ चिपवर जगातील गाड्या धावताना दिसतील. भारतात हायड्रोजन हब बनविण्याचा संकल्प आहे. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारे हे आमचे सरकार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत उपचार

“केंद्रात काँग्रेसप्रणीत आघाडीचे सरकार असताना महागाई आणि भ्रष्टाचार असे दुहेरी कर जनतेला भरावे लागत होते,” अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, “सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही महागाई नियंत्रणात आणली. भ्रष्टाचारमुक्त सरकार दिले. आयकराची मर्यादा वाढविली. आता वयाची ७० वर्षे ओलांडलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मोफत उपचार मिळतील, ही ‘मोदींची गँरेटी’ आहे.”

राहुल गांधींवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडताना मोदी म्हणाले, “शहेजाद्याला विचारले गरिबीचे कसे निर्मूलन होणार, त्यावर शहेजादे म्हणतात, ‘खटाखट’ आहे. युवराजला विचारले विकास कसा होतो, तर त्यावर ते म्हणतात, ‘खटाखट,टकाकट आहे.’ काँग्रेस परत ‘लायसन्स राज’ आणू पाहत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Narendra Modi
Narendra Modi Speech : मोदींनी मारले रेसकोर्सचे मैदान

गरिबांना सरकार उपलब्ध होईल

देशातील मध्यम वर्गाला उद्देशून मोदी म्हणाले, “मध्यम वर्गीयांच्या आयुष्यात सरकार ही एक कटकट असते. ती बंद झाली पाहिजे. वेळोवेळी होणारा सरकारचा हस्तक्षेप नसला पाहिजे. तसेच गरिबांना प्रत्येक वेळेला सरकार उपलब्ध हवे, अशी व्यवस्था उभारणार आहे. हे परिवर्तन २०४७ पर्यंत होईल.”

भटकता आत्मा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील एका नेत्याने राजकारण अस्थिर केले आहे. हा अस्थिरतेचा खेळ त्यांनी ४५ वर्षांपूर्वी सुरू केला. अनेक मुख्यमंत्री अस्थिर केले. केवळ विरोधकांनाच नाही, तर स्वतःचा पक्षही अस्थिर केला. कुटुंबातही अस्थिरता आणली. ज्यांची स्वप्ने अद्यापही पूर्ण झाली नाहीत, असा भटकता आत्मा आहे. महाराष्ट्र त्याचा शिकार झाला आहे. हाच भटकता आत्मा १९९५ मध्ये युती सरकार अस्थिर करण्याचा सातत्याने प्रयत्न करत होता. २०१९ मध्ये या आत्म्याने राज्यातील जनतेच्या बहुमताचा अपमान केला.

वर्तमानपत्रे हे छापणार नाहीत...

‘रिमोटवर चालणाऱ्या मनमोहनसिंग सरकारने पायाभूत सुविधांवर दहा वर्षांत जेवढा खर्च केला, तेवढा आम्ही दरवर्षी करतो,’ असे सांगून मोदी यांनी पुणेकरांना हा आकडा लक्षात ठेवण्याचे आवाहन केले. ‘हा आकडा लक्षात ठेवायला सोपा आहे. लक्षात ठेवा, कारण वर्तमानपत्रे हे छापणार नाहीत. ते कुठे तरी फोन करून विचारतील, छापायचे की नाही’ अशी टिप्पणी मोदी यांनी केली.

मोदी अभी जिंदा है!

‘‘विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्नाटकात काँग्रेसने एका रात्रीत मुस्लिमांना ‘ओबीसीं’चे आरक्षण दिले. केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर ते दलित, आदिवासी, ‘ओबीसीं’चे आरक्षण काढून ते मुस्लिमांना देतील. मात्र मी जिवंत असेपर्यंत या देशात धर्मावर आधारित आरक्षण होऊ देणार नाही,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

मोदी म्हणाले...

  • जनऔषधी केंद्रांमधून ८० टक्के सूट

  • ज्येष्ठांवरील दवाखान्याचा खर्च कमी करणार ही मोदींची गॅरंटी

  • मध्यमवर्गीयांच्या घरासाठी ‘रेरा’चा कायदा

  • गरिबांसाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण, पण बँकेत गरिबांना स्थान नाही

  • ज्यांना बँकेत कोणी गॅरंटर नसते, त्यांना मोदींची गॅरंटी असते

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे गरिबाचा मुलगा पंतप्रधान झाला

  • डॉ. आंबेडकर हे मला देवापेक्षा कमी नाहीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com