Nashik Constituency Lok Sabha Election Result : नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे किंग! ठाकरे गटाने गोडसेंना दाखवलं अस्मान

Nashik Lok Sabha Election Result 2024 Shivsena UBT Rajabhau Waje Shivsena Hemant Godse Shantigiri maharaj : हेमंत गोडसे विरूद्ध राजाभाऊ वाजे यांच्यातील मुख्य लढतीकजे नाशिक लोकसभा मतदारसंधातील संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
Nashik Constituency Lok Sabha Election Result : नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे किंग! ठाकरे गटाने गोडसेंना दाखवलं अस्मान

Nashik Lok sabha result 2024 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले होते. तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली. तर अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे करण गायकर यांना उमेदवारी मिळाली होती.

नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना धक्का देत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी विजयी आघाडी घेतली आहे. वाजे यांनी १ लाख ८१ हजार ७६३ एवढी मतं घेऊन ३८ हजार ३०१ मतांची आघाडी घेतली आहे. तर हेमंत गोडसे यांनी १४३४६२ इतकी मतं घेतली होती. तर अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांना या निवडणुकीत २१२२० इतकी मते मिळाली आहेत. ही आकडेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीची आहे.

नाशिक लोकसभेतील विधानसभा मतदारसंघांची स्थिती

नाशिक लोकसभा मतदारसंघात महापालिका हद्दीतील साडेतीन तर, ग्रामीण भागातील अडीच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये नाशिक मध्य, पूर्व व पश्चिम या तिनही विधानसभ मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर देवळाली शहरी आणि ग्रामीण तसेच सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तर इगतपुरी विधानसभेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान करणारे मतदार हे ६० टक्के शहरी आहेत.

नाशिक लोकसभा मतदारस संघात २००४, २००९ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय मिळाला होता, तर २०१४, २०१९ मध्ये नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार राहिला आहे

२०१९मध्ये काय होती स्थिती?

नाशिकमध्ये २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले हेमंत गोडसे विजयी झाले आहेत. २०१९ च्या लोकसभेत हेमंत गोडसेंना ५६३५९९ इतकी मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ हे २७१३९५ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. विजयी उमेदवार हेमंत गोडसे हे २९२२०४ च्या मताधिक्याने विजयी ठरले.

नाशिकमध्ये २०२४ च्या निवडणुकीतील मुद्द्यांचा विचार करायचा झाल्यास मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन, तसेच रखडलेला नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि नवीन औद्योगिक वसाहत. तसेच शहरातील रखडलेला आयटी पार्कचा प्रश्न हे मुद्दे चर्चेत राहिले.

यंदाच्या निवडणुकीत गाजलेले मुद्दे

नाशिकमध्ये २०२४ च्या निवडणुकीतील मुद्द्यांचा विचार करायचा झाल्यास मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन, तसेच रखडलेला नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि नवीन औद्योगिक वसाहत. तसेच शहरातील रखडलेला आयटी पार्कचा प्रश्न हे मुद्दे चर्चेत राहिले.

नाशिक मतदारसंघात यंदा झालेलं मतदान

Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com