Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

प्रज्वल रेवण्णा यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी कॉँग्रेस पक्ष कमालीचा आक्रमक झाला आहे.
Prajwal Revanna candidate of Hassan Lok Sabha
Prajwal Revanna candidate of Hassan Lok Sabhaesakal
Summary

एसआयटी चौकशीत ते दोषी आढळले तर भाजप व धजदच्या युतीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

बेळगाव : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (JDS) खासदार व हासन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराची दिशा बदलली आहे. हुबळी येथील नेहा हिरेमठ या महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणी पिछाडीवर गेलेल्या कॉँग्रेसला (Congress) ऐन निवडणुकीच्या धामधुमीतच आता नवा मुद्दा मिळाला आहे.

Prajwal Revanna candidate of Hassan Lok Sabha
Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

प्रज्वल रेवण्णा यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी कॉँग्रेस पक्ष कमालीचा आक्रमक झाला आहे. त्याचा परिणाम राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानावर होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर कॉँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया सुनेत यानी कॉँग्रेसच्या दिल्ली येथील मुख्यालयात पत्रकार परिषद घेतलीच; शिवाय दुसऱ्याच दिवशी त्यांनी बेळगावातही पत्रकार परिषद घेतली.

Prajwal Revanna candidate of Hassan Lok Sabha
Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

राज्यात लोकसभा निवडणुकीत धजद व भाजपची युती आहे. त्यामुळे या प्रकरणात भाजपही अडचणीत आला आहे. कॉँग्रेसकडून दोन्ही पक्षांना घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. प्रज्वल रेवण्णा प्रकरणामुळे नेहा हिरेमठ खूनप्रकरणाची चर्चा कमी झाली आहे. परंतु, नेहा हिरेमठ हिच्या पालकांची भेट घेण्याच्या निमित्ताने भाजप नेते सातत्याने हुबळी येथे जात आहेत. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीतही ते प्रकरण चर्चेत ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे.

नेहा हिरेमठ हिच्या खुनानंतर (Neha Hiremath Murder Case) राज्यात व देशभरातही भाजप आक्रमक झाला होता. घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात निषेध मोर्चे काढण्यात आले. भाजपच्या बहुतेक सर्व वरिष्ठ नेत्यांनी हुबळी येथे जाऊन नेहाच्या पालकांची भेट घेतली. हे प्रकरण प्रारंभी कॉँग्रेसला नीट हाताळता आले नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह कॉँग्रेसच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. त्यामुळे कॉँग्रेसला त्याचा फटका बसणार, असेच चित्र तयार झाले होते.

Prajwal Revanna candidate of Hassan Lok Sabha
काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार निपाणीत; म्हणाले, 'मोदींची हुकूमशाही किती दिवस सहन करणार'

...तर भाजप-धजदच्या युतीवर परिणाम

दक्षिण कर्नाटकातील १४ लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात मतदान झाले. त्या १४ मतदारसंघांत या घटनेचा फारसा फटका कॉँग्रेसला बसणार नसला तरी उत्तर कर्नाटकातील १४ मतदारसंघांत मात्र कॉँग्रेसला अडचण निर्माण झाली होती. परंतु, १४ मतदारसंघांतील मतदान होण्याआधी प्रज्वल रेवण्णा प्रकरण बाहेर आले. त्यामुळे आता भाजप व धजद पिछाडीवर गेल्याचे चित्र आहे. या प्रकरणात कॉँग्रेसकडून धजदऐवजी भाजपला लक्ष्य केले जात आहे.

प्रज्वल रेवण्णाप्रकरणाचा उत्तर कर्नाटकात परिणाम होणार नाही, असा दावा भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे. परंतु, पुढील चार-पाच दिवसांत कॉँग्रेस याप्रकरणी किती आक्रमक होणार हे ठरणार आहे. प्रज्वल रेवण्णा यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. परंतु, एसआयटी चौकशीत ते दोषी आढळले तर भाजप व धजदच्या युतीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com