Palghar Constituency Lok Sabha Election Result : पालघरमध्ये भाजपने फडकवला झेंडा! तिरंगी लढतीत हेमंत सावरा विजयी

Palghar Lok Sabha Result 2024 BVP rajesh patil bjp hemant savara shivsena ubt Bharti Kamdi : पालघर लोकसभा मतदारसंघ हा आदिवासींसाठी राखीव असलेला मतदारसंघ असून येथे तिरंगी लढत पाहायला मिळाली.
Palghar Lok Sabha Election Result 2024
Palghar Lok Sabha Election Result 2024

Palghar Lok Sabha Election Result 2024 : पालघर लोकसभा मतदारसंघ हा आदिवासींसाठी राखीव असलेला मतदारसंघ असून येथे तिरंगी लढत पाहायला मिळाली. पालघरमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा विजयी झाले आहेत.

पालघर मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे डॉ. हेमंत सावरा तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवसेनेचे (शिंदे गट) राजेंद्र गावित हे आहेत. बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळिराम जाधव यांचा पराभव करून ते विजयी झाले होते. पालघर लोकसभेसाठी यंदा ६३.९१ टक्के मतदान झालं होतं. त्यानंतर या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

पालघर लोकसभा मतदार संघात २० मे रोजी झालेल्या मतदानात एकूण मतदारांपैकी ६३.९१ टक्के मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात एकूण २१,४८,५१४ मतदार असून त्यापैकी १३,७३,१७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर डहाणू ६३.७५ टक्के, पालघर ७०.३४ टक्के, नालासोपारा ५२.३२ टक्के, विक्रमगड ७४.४५ टक्के, बोईसर ६४.६५ टक्के तर वसई ५९.१२ टक्के इतकं मतदान झालं.

पालघर लोकसभा मतदारसंघातील आमदारांबद्दल बोलायचे झाल्यास डहाणू येथे विनोद निकोले ( कम्युनिस्ट पार्टी), पालघरमध्ये श्रीनिवास वनगा (शिवसेना -शिंदे गट), विक्रमगड - सुनील भुसारा (राष्ट्रवादी शरद पवार गट), बोईसर - राजेश पाटील (बविआ), नालासोपारा - क्षितिज ठाकूर (बविआ), वसई - हिंतेद्र ठाकूर ( बविआ) हे आमदार आहेत.

Palghar Lok Sabha Election Result 2024
Kalyan-Palghar Lok Sabha Election: कल्याणनंतर पालघरमध्येही भाजप-शिवसेनेत संघर्ष तापला? शिंदे-फडणवीसांचं टेन्शन वाढलं....

२०१९ चा निकाल

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये राजेंद्र गावित (शिवसेना) हे ५८०४७९ इतकी मते घेऊन विजयी झाले होते. तर बळिराम जाधव (बहुजन विकास आघाडी) यांना दुसऱ्या क्रमांकाची ४९१५९६ मते मिळाली होती, दत्तराम जयराम कारबत (अपक्ष) १३९३२ मते तर सुरेश अर्जुन पडवी (वंचित बहुजन आघाडी) यांना १३७२८ मते मिळाली होती. तर विजयी उमेदवाराचे मताधिक्य ८८८८३ इतकी मते राहिले होते.

पालघर मतदारसंघात दर लोकसभा निवडणुकीत बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. २००९ साली येथे बहुजन विकास आघाडीला यश मिळालं होतं. तर २०१४ मध्ये भाजप आणि २०१९ मध्ये शिवसेना पक्ष विजयी झाला होता.

Palghar Lok Sabha Election Result 2024
Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

हे मुद्दे ठरले प्रभावी

महापालिकेतील समाविष्ट गावांचा मुद्दा या मतदारसंघात विशेष गाजला. त्यासोबतच वसई, बोईसर आणि नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असल्याने भाजप आणि शिवसेनेपुढे आव्हान निर्माण झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांत झालेली फाटाफूट हा देखील निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com