ओडिशात राजकीय पक्षांचा ऑनलाइन प्रचाराला वेग; सोशल मीडियाचा वापर, इन्फ्लूएन्सरची मदत; सत्ताधारी ‘बीजेडी’ आघाडीवर

ओडिशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार आहे. लोकसभेच्या २१ आणि विधानसभेच्या १४७ जागांसाठी १३ मेपासून चार टप्प्यांत मतदान होणार आहे.
Political parties speed up online campaigning
Political parties speed up online campaigning Sakal

भुवनेश्‍वर : ओडिशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार आहे. लोकसभेच्या २१ आणि विधानसभेच्या १४७ जागांसाठी १३ मेपासून चार टप्प्यांत मतदान होणार आहे. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया व्यासपीठांवर राजकीय पक्षांचा प्रचार वेग घेऊ लागला आहे.

मोठ्या प्रमाणावर मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी, विशेषत: सातत्याने ऑनलाइन असणाऱ्या तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी डिजिटल जाहिराती देऊन तसेच सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांचा (सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर) आधार घेत नेते आणि त्यांचे पक्ष प्रचाराला लागले आहेत. एका अहवालानुसार सत्तेवरील बिजू जनता दल (बीजेडी) आणि त्याच्या सहयोगी घटकांचा सोशल मीडियाच्या जाहिरातींमध्ये सर्वात मोठा वाटा आहे.

फेसबुक आणि इंस्टाग्रामकडे मालकी असलेल्या ‘ॲड लायब्ररी’ने २७ डिसेंबर २०२३ ते २५ मार्च २०२४ या ९० दिवसांमधील ऑनलाइन प्रचारकार्याचा मागोवा घेतला आहे. याकाळात ‘बीजेपी ओडिशा’ हँडलला सर्वाधिक १४ लाख फॉलोअर होते.

त्याखालोखाल ‘अमा ओडिशा नवीन ओडिशा’ च्या फेसबुक आणि इंस्टाग्राम हँडलला १९ हजार ९०० फॉलोअर होते. ‘बीजेडी’शी संबंधित ‘नवीन ओडिशा’ (५१ हजार ७०० फॉलोअर) आणि ‘बीजेडी ओडिशा फॉरएव्हर’ (सात लाख ५४ हजार फॉलोअर) ही आणखी दोन पेज आहेत.

‘काँग्रेस - ओडिशा’ला एक लाख २६ हजार फॉलोअर आहेत. ‘बीजेडी ओडिशा फॉरएव्हर’चे पेज सत्ताधारी पक्षाच्या सोशल मीडिया कक्षाकडून हाताळले जाते. यावर प्रायोजित केलेल्या जाहिराती मुख्यतः या पक्षाच्या विविध योजनांबद्दल असतात.

इन्फ्लूएन्सरकडून राजकीय प्रचार

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने राजकीय संदेश किंवा विकास योजना, विकासकामांचा प्रचार करण्यासाठी पक्ष त्यांचाही वापर करीत आहे. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरद्वारे वेगवेगळ्या पोस्ट, व्हिडिओ ब्लॉग, रील्स आदींद्वारे मतदारांशी त्वरित संपर्क साधणे सहज शक्य होते.

त्यामुळे निवडणुकीचा हंगाम म्हणजे जुन्या आणि नवीन सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरसाठी कमाईचे दिवस ठरत आहे. फॉलोअरच्या संख्येनुसार सध्या इन्फ्लूएन्सर एका पोस्टमागे एक हजार ते दोन हजार रुपये कमवीत आहेत. प्रत्येक पक्षाने सर्जनशील संस्थांची मदत प्रचारासाठी घेतली आहे.

ओडिशातील सर्व २१ लोकसभा मतदारसंघात भव्य प्रचारसभा आयोजित केल्या जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा तसेच भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह देखील संबोधित करणार आहेत.

- गोलक महापात्रा,प्रदेश उपाध्यक्ष, ओडिशा

नवीन पटनाईक यांना देशाचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री बनण्यासाठी यंदाही त्यांना सत्तेवर आणण्याचा आशीर्वाद देण्याचा निर्णय ओडिशाच्या जनतेने घेतला आहे. आगामी निवडणुकीत आमचा पक्ष बहुमत मिळवेल.

- सुधीर सामल, आमदार, बीजेडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com