Loksabha Election 2024 : पुणे, शिरूरमध्ये तिरंगी लढत ; ‘वंचित’कडून पुण्यात मोरे, शिरूरमध्ये बांदल

पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित विकास आघाडीने अनुक्रमे वसंत मोरे आणि मंगलदास बांदल यांना पक्षाची उमेदवारी जाहीर केली. यामुळे दोन्ही मतदारसंघांत आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal

पुणे : पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित विकास आघाडीने अनुक्रमे वसंत मोरे आणि मंगलदास बांदल यांना पक्षाची उमेदवारी जाहीर केली. यामुळे दोन्ही मतदारसंघांत आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वंचित विकास आघाडीने वसंत मोरे यांना पुणे; तर मंगलदास बांदल यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात आता भाजपचे उमेदवार मुरली मोहोळ, काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर आणि ‘वंचित’चे उमेदवार मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि वंचित विकास आघाडीचे उमेदवार मंगलदास बांदल यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

पुणे मतदारसंघातील ‘वंचित’चे उमेदवार मोरे यांनी तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे. याआधी त्यांनी मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी आणि महापालिकेत गटनेते म्हणूनही काम केलेले आहे. त्यांनी २०१९ मध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ते नुकतेच मनसेनेतून बाहेर पडले.

Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 : ‘एसडीपीआय’चा काँग्रेसला पाठिंबा कसा?

दरम्यान पुणे मतदारसंघातील उमेदवारीसाठी पाठिंबा मिळावा, यासाठी त्यांनी नुकतीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचीही अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली होती. शिरूर मतदारसंघातील ‘वंचित’चे उमेदवार बांदल हे पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती आहेत.

पुण्यात दोन मनसैनिकांत लढत

पुणे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार धंगेकर हे पूर्वी मनसेत होते. ‘वंचित’चे उमेदवार मोरेही पूर्वाश्रमीचे मनसेचे नेते आहेत. या दोघांनीही ‘मनसे’च्या स्थापनेपासून काही काळ एकत्र काम केले आहे. दोघे मित्र आहेत. त्यामुळे दोघांच्या उमेदवारीने मतदारसंघात आता पूर्वाश्रमीच्या दोन मनसैनिकांमध्येच मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com