Pune Loksabha Constituency
Pune Loksabha Constituencysakal

Pune Loksabha Constituency : राहुल गांधींची शुक्रवारी पुण्यात सभा

पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा होणार आहे. शुक्रवारी (ता. ३) दुपारी चार वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाजवळील (आरटीओ) एसएसपीएमएस संस्थेच्या मैदानात सभा होईल.
Published on

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा होणार आहे. शुक्रवारी (ता. ३) दुपारी चार वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाजवळील (आरटीओ) एसएसपीएमएस संस्थेच्या मैदानात सभा होईल.

पुणे, शिरूर व बारामती लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारांचे निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत क्वार्टर गेट परिसरात सभा झाली होती. त्यानंतर धंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची पुण्यात सभा होईल, अशी चर्चा सुरू होती.

गांधींच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात उत्सुकता असल्याने जिल्हा शहर काँग्रेस कमिटीतर्फे जोरदार प्रयत्न करण्यात येत होते. त्यानुसार धंगेकर यांच्यासह बारामती, शिरूर व मावळ मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी गांधींची पुण्यात सभा होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली.

Pune Loksabha Constituency
Loksabha Election 2024 : जाहीरनाम्यात कामगार हक्क दुर्लक्षित ; नाममात्र पक्ष वगळता ठोस भूमिका नाही

सभेला चारही मतदारसंघांमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. याबरोबरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com