Raigad Lok Sabha: सुनील तटकरेंना लढत कठीण, अनंत गीतेंचे काय? रायगड लढतीत चुरस वाढली

Raigad Lok Sabha: अलिबाग, पेणमधील भाजपने तर सुरुवातीपासून तटकरेंच्या उमेदवारीस असहकार दर्शविला होता. दापोलीचे आमदार योगेश कदम, महाडचे आमदार भरत गोगावले, पेणचे आमदार रविसेठ पाटील यांच्या राजकीय प्रवासात सुनील तटकरे यांनी यापूर्वी अडथळे आणले होते.
Raigad Lok Sabha
Raigad Lok Sabhaesakal

Raigad Lok Sabha:   अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारच्या शेवटच्या दिवसापर्यंत रायगड जिल्ह्यातून एकूण २८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीचे सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीचे अनंत गीते यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, लोकराज्य, काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आले. यात प्रमुख उमेदवारांच्या नावाशी साम्य असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने रायगडच्या लढतीत अधिकच चुरस निर्माण झाली आहे.

मागील निवडणुकीत सुनील तटकरे यांनी ३१ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. आताची निवडणूक महायुतीकडून लढविताना तटकरेंनी सहज विजय मिळवला पाहिजे होता; मात्र मागील काही दिवसांच्या राजकीय घडामोडींमुळे सुनील तटकरेंना ही लढत कठीण जाईल, असे चित्र आहे.

अनंत गीते यांनी दीड वर्षापासून निवडणुकीची तयारी केली आहे; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरेंना स्वतःचीच उमेदवारी जाहीर करून जेमतेम दहा दिवस होत आहेत. त्यातच पक्ष फुटीमुळे अनंत गीतेंना मतदारसंघात सहानुभूती मिळताना दिसते. महायुतीच्या मित्र पक्षांचा प्रचारातील सहभाग हादेखील महत्त्वाचा अडथळा सुनील तटकरेंसमोर आहे. गुहागर, दापोली या मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते युती धर्म पाळत कामाला लागलेले आहेत; तर पेण, अलिबाग येथील प्रचारातील सहभाग अलिप्तपणाचा वाटतो.

अलिबाग, पेणमधील भाजपने तर सुरुवातीपासून तटकरेंच्या उमेदवारीस असहकार दर्शविला होता. दापोलीचे आमदार योगेश कदम, महाडचे आमदार भरत गोगावले, पेणचे आमदार रविसेठ पाटील यांच्या राजकीय प्रवासात सुनील तटकरे यांनी यापूर्वी अडथळे आणले होते. एकेकाळी हे सुनील तटकरेंचे प्रखर विरोधक होते. या सर्वांचे मनोमिलन घडवत गुरुवारी (ता. १८) अर्ज भरताना या सर्वांना एकाच व्यासपीठावर आणण्यात सुनील तटकरेंना यश आले होते. या सर्वांनी सुनील तटकरे यांना विजयी करणार, असा निर्धार केला आहे.

Raigad Lok Sabha
Dhangar Reservation : सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षणाची याचिका फेटाळली

अनंत गीते कुणबी मतांच्या बळावर आतापर्यंत सहज विजय मिळवत असत, त्या कुणबी समाजातील मतदारांना जवळ करण्यात तटकरेंनी यश मिळवले आहे. सहा वेळा निवडून दिल्यानंतर कोकणच्या विकासासाठी अनंत गीते यांनी काय दिले, असा प्रश्न हे मतदार विचारू लागले आहेत. याचा सर्वाधिक फटका अनंत गीतेंना बसण्याची शक्यता आहे.

कोकणातून जवळजवळ दिसेनासा झालेला काँग्रेस, अलिबाग, पेण आणि काही प्रमाणात रोहा तालुक्यात शिल्लक असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या जोरावर अनंत गीते पुन्हा विजयी होण्याचा दावा करीत आहेत, तर त्याचवेळेस सुनील तटकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करीत सर्व डावपेच लढविण्यास सुरुवात केली आहे. अनंत गीते यांच्या नावाप्रमाणे अन्य दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टी, मुस्लिम समाज, कुणबी समाज यांची मते अनंत गीतेंना मिळू नयेत याचीही खबरदारी घेतली जात आहे.a

Raigad Lok Sabha
Lok Sabha Voting: वोट केलं तर कापतात बोट! 'या' पोलिंग बूथवर झालं नाही एकही मतदान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com