Sangali Lok Sabha Result: विशाल पाटलांचा बंड यशस्वी?, मतमोजणीत अव्वल! 54 हजार मतांनी आघाडीवर

Sangali Lok Sabha Result 2024: देशाच्या राजकणात सांगली लोकसभा जागा चर्चेत आहे. विशाल पाटील यांनी बंड करत लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी भाजपचे संजयकाका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना तगडी फाईट दिली आहे.
Sangali Lok Sabha Result vishal patil
Sangali Lok Sabha Result vishal patilesakal

Sangali Lok Sabha Result 2024:

लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सांगलीची जागा संपूर्ण देशात चर्चेत होती. कारण काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने विशाल पाटील या जागेवरून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. विशाल आणि संजयकाका यांच्यात चुरशीची स्पर्धा असल्याचे मानले जात आहे. मात्र, या जागेवर विशाल पाटील यांचा फायदा होताना दिसत आहे. विशाल पाटील सुरुवातीपासून मतमोजणीत आघाडीवर आहेत.

विशाल पाटील ५३ हजार ५८३ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना आतामपर्यंत २ लाख ८७ हजार २१८ मते मिळाली आहेत. तर संजयकाका पाटील यांना २ लाख ३३ हजार ६३५ मते मिळाली.

कोण आहे विशाल पाटील?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी सांगली मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता.

काँग्रेस महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा भाग आहे आणि युतीमध्ये सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे गेली. त्यांना या जागेवरून काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवायची होती, मात्र जागावाटपानंतर ते रिकाम्या हाताने गेले. यामुळे त्यांनी बंड केला होता.

Sangali Lok Sabha Result vishal patil
Maharashtra Lok Sabha Election Results Live : शिरुरमधून अमोल कोल्हे ९ हजार तर विशाल पाटील ७ हजार मतांनी आघाडीवर, पुण्यातून रविंद्र धगेंकरांनी घेतली आघाडी

सांगलीत तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले

तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील लोकसभेच्या इतर १० जागांसह सांगली मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान झाले. महाराष्ट्रात सात टप्प्यात निवडणुका झाल्या.

Sangali Lok Sabha Result vishal patil
India Lok Sabha Election Results Live : तुफानी सुरुवातीनंतर भाजपाची गती मंदावली, इंडिया आघाडीकडून कडवी टक्कर... काय आहे तासाभराचे कल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com