Sangli Constituency Lok Sabha Election Result
Sangli Constituency Lok Sabha Election Resultesakal

Sangli Constituency Lok Sabha Election Result: विशाल पाटलांचा लिफाफा दिल्लीत पोहचला, कदमांनी केला संजयकाकांचा करेक्ट कार्यक्रम?

Vishal Patil Won Sangli Lok Sabha Election Result 2024 : भाजपचे संजयकाका पाटील यांचा २०१९ मध्ये १,६४,३५२ मतांनी विजय झाला होता. त्यांना ५,०८,९९५ मते मिळाली होती. स्वाभिमानी पक्षाकडून विशाल पाटील यांना ३,४४,६४३ मते मिळाली होती.

सांगली लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. विशाल पाटील यांना ५ लाख ७२ हजार ६६६ मते मिळाली. तर संजयकाका पाटील यांना ४ लाख ७१ हजार ६१३ मते मिळाली. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना ६० हजार ८६० मते मिळाली. विशाल यांचा १०००५३ मतांनी विजय झाला आहे.

विशाल पाटील यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. सांगलीतील सर्व पदाधीकारी माझ्या पाठिमागे होते. ज्यांना धमक्या मिळाल्या त्यांच्या मी पाठिशी आहे. सांगलीतील प्रत्येक व्यक्तिचा खासदार म्हणून मी काम करणार आहे, असे विशाल पाटील म्हणाले.

सांगली लोकसभा मतदारसंघावर यावेळी संपूर्ण देशाचे लक्ष होते. कारण सांगली काँग्रेसचे विशाल पाटील यांनी केलेला बंड चर्चेत आला. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडली म्हणून ठाकरे गटाने सांगलीत आपला उमेदवार दिला. मात्र काँग्रेसचा हा पारंपारिक मतदारसंघ आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली आणि जिंकली. त्यांनी भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि चंद्रहार पाटील यांचा पराभव केला.

Sangli Constituency Lok Sabha Election Result
Maharashtra Lok Sabha Election Results Live : मतमोजणीला सुरुवात; बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर,

पहिल्या फेरीपासून विशाल पाटील यांनी मतमोजणीत लीड घेतली.

२०१४ ला भाजपने मोदी लाटेत काँग्रेसच्या गडावर विजय मिळवला होता. भाजप उमेदवाराने २०१४ ला अडीच लाख मतांनी, तर २०१९ ला दीड लाख मतांनी विजय मिळविला होता. या खेपेसही भाजपने तिसऱ्यांदा संजयकाका पाटील यांनाच उमेदवारी दिली होती. अपक्ष विशाल पाटील, भाजपचे संजयकाका पाटील तर ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे निवडणुकीत आमने-सामने होते.

२०१९ कुणाला किती मतदान झालं?

भाजपचे संजयकाका पाटील यांचा २०१९ मध्ये  १,६४,३५२ मतांनी विजय झाला होता. त्यांना ५,०८,९९५ मते मिळाली होती. स्वाभिमानी पक्षाकडून विशाल पाटील यांना ३,४४,६४३ मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघडीकडून गोपीचंद पडळकर यांना ३,००,२३४ , आनंद शंकर नलगे (पाटील) यांना ७२१३ मताधिक्य मिळाले होते.

यावेळी झालेलं मतदान -

सांगली लोकसभेसाठी २०१९ मध्ये ६५.३८ टक्के मतदान झाले होते. २०२४ च्या निवडणुकीत ३.११ टक्के मतदानाची घट होऊन ६२.२७ टक्के मतदान झाले. सांगली लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

विधानसभा मतदारसंघ - २०१९ - २०२४

तासगाव - ६९.३३  -६६.०८
सांगली - ६२.९७ - ६०.९७
खानापूर  - ६४.३२ - ५८.९३
पलूस -  ६७.५४  - ६२.३५
जत  - ६२.८३  - ६०.७६
मिरज  - ६४.३१ -  ६४.७९
एकूण  - ६५.३८ -  ६२.२७

विधानसभा मतदारसंघात कुणाची सत्ता? -

सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये जत, तासगाव - कवठेमहांकाळ, खानापूर - आटपाडी, पलूस - कडेगाव, मिरज आणि सांगलीचा समावेश आहे. सध्या पलूस-कडेगाव आणि जत काँग्रेसकडे, तासगाव राष्ट्रवादीकडे, खानापूर-आटपाडी शिवसेना शिंदे गटाकडे, सांगली व मिरज भाजपकडे आहे.

Sangli Constituency Lok Sabha Election Result
India Lok Sabha Election Results Live : देशात मतमोजणी सुरू... 5 मिनिटात पहिला कल हाती! भाजपा 8 तर इंडिया 6

हे मुद्दे निवडणुकीत ठरले प्रभावी -

अंतर्गत गटबाजी सांगली लोकसभा मतदारसंघात चांगलीच दिसली. उमेदवारीवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद झाले. हे वाद दिल्लीत देखील पोहचले. यासोबत शुद्ध पाणीपुरवठ्याचा अभाव, संजय पाटील यांच्याबद्दलची पक्षांतर्गत नाराजी, दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्प, विमानतळ व ड्रायपोर्टचा प्रश्न,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातील वर्चस्वाची लढाई, या मुद्यांनी ही निवडणूक गाजवली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com