Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

माजी मंत्री अजितराव घोरपडे हे अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या पाठीशी आहेत.
Sangli Lok Sabha
Sangli Lok Sabhaesakal
Summary

माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर करत त्यांच्या प्रचारार्थ बैठकांचा धडाका सुरू केला आहे.

कवठेमहांकाळ : जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) निवडणुकीच्या केंद्रस्थानी कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) तालुका आला आहे. निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय पाटील (Sanjay Patil) व अपक्ष विशाल पाटील यांच्यामध्ये लढत असली तरी महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील देखील रिंगणात आहेत. तालुक्यात निवडणुकीत प्रचाराचा वेग घेतला आहे. महायुतीचे संजय पाटील विरुद्ध अपक्ष विशाल पाटील अशी लढत आहे.

Sangli Lok Sabha
Satara Lok Sabha : 'मोदींच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जातंय'; शरद पवारांची पंतप्रधानांवर सडकून टीका

माजी मंत्री अजितराव घोरपडे हे अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या पाठीशी आहेत. त्यांनी तालुक्यामध्ये पायाला भिंगरी लावून प्रचारात पुढाकार घेतल्याने निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. एकंदरीत, शहरासह तालुक्याच्या राजकारणात कोण वरचढ ठरणार, हे लवकरच समजेल.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या तालुक्याच्या राजकारणात प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे प्रयोग झाले आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याने या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर करत त्यांच्या प्रचारार्थ बैठकांचा धडाका सुरू केला आहे. नुकत्याच झालेल्या शहरातील सभेत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी खासदार संजय पाटील याच्यावर जोरदार टीका केली. घोरपडे यांचे चिरंजीव राजवर्धन यांनीही पुढाकार घेत गावोगावी संपर्क, भेटीगाठी घेण्यास सुरवात केली आहे.

Sangli Lok Sabha
Sangli Lok Sabha : 'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठीशी, त्यांची भूमिका संशयास्पद'; ओबीसी नेते शेंडगेंची टीका

महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांचा तालुक्यात गट आहे. त्यांनीही गावागावांत कार्यकर्त्यांचा गट उभा केला असून हा गट सध्या निवडणुकीमध्ये प्रचारात असून त्यांच्या बाजूने काम करत आहे. संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर यांनीही गावोगावी संपर्क वाढवत महायुतीच्या उमेदवाराचे पाठीशी पुन्हा एकदा राहण्याचे आवाहन केले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराची सुरवात तालुक्यात सुरू आहे. दरम्यान, आमदार सुमन पाटील यांचा तालुक्यात गट असून त्यातील काही प्रमुख कार्यकर्ते अपक्ष उमेदवार विशाल पाटील याच्या प्रचारात दिसत आहेत. तेव्हा तालुक्याच्या राजकरणात चालले आहे तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Sangli Lok Sabha
छत्रपती शिवराय आदिल शहासमोर कधीच झुकले नाहीत, पण उदयनराजे अमित शहांपुढे झुकले; आप खासदाराची घणाघाती टीका

पक्षाचे नेते उघडपणे अपक्षांच्या मदतीला

अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात मात्र तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते हे उघडपणे काम करत आहेत. बसप, शेतकरी संघटनांसह अन्य पक्षांचा तालुक्यात प्रचार सुरू आहे. त्यामुळे तालुक्यात कोण बाजी मारणार, हे लवकरच समजेल. एकीकडे, तालुक्याच्या राजकारणात दिवसेंदिवस वातावरण जोरदार तापू लागले आहे. त्यामुळे गावोगावी पारावर राजकीय चर्चांना ऊत आला असून दुसरीकडे प्रचाराचा वेग वाढू लागला आहे. भेटी-गाठी ,बैठका आणि प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय वातावरण उन्हाळाबरोबर जोरदार तापले आहे. त्यातच प्रचाराचा वेगही वाढू लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com