Sangli Lok Sabha : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार यांच्या उमेदवारीनंतर नवा ट्विस्‍ट; बाबर-पाटील गटाच्या भूमिकांकडं लक्ष

भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच संजय पाटील यांनी खानापूर तालुक्यात प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे.
Sangli Lok Sabha Chandrahar Patil Shiv Sena
Sangli Lok Sabha Chandrahar Patil Shiv Senaesakal
Summary

खानापूर तालुक्यात कधी काळी काँग्रेसची मोठी ताकद होती. शेतकरी कामगार पक्ष आणि डावे पक्ष विरोधात असायचे.

विटा : खानापूर (Khanapur) तालुक्यातील दोन भाऊंच्या गटांत फिरत असलेल्या राजकारणात यावेळी प्रथमच टि्वस्ट येण्याची शक्यता आहे. माजी आमदार दिवंगत अनिल बाबर आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या बदललेल्या राजकीय भूमिका, काँग्रेस-राष्ट्रवादीतील फूट, भाजपमध्ये नव्याने झालेली मेगाभरती, तालुक्याचे भूमिपुत्र चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना शिवसेनेकडून जाहीर झालेली उमेदवारी आणि काँग्रेसकडेच, म्हणजे विशाल पाटीलच महाविकास आघाडीचे उमेदवार असावेत, यासाठी आमदार विश्‍वजित कदम यांनी लावलेली ताकद, यामुळे नेमकी लढत कशी होणार, याबाबत संभ्रम आहे.

Sangli Lok Sabha Chandrahar Patil Shiv Sena
Madhu Dandavate : ..तर एक मराठी माणूस पंतप्रधान झाला असता; पक्षाचे अध्यक्ष असूनही त्यांनी 'तसं' केलं नाही!

मात्र या वेळी तालुक्याच्या राजकारणात नवी समीकरणे पुढे येतील, अशी चिन्हे आहेत. राज्यात उद्धव ठाकरे यांना पायउतार करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद पटकावले. या सर्व घडामोडींत खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) अग्रभागी होते. मात्र आता आमदार बाबर यांचे निधन झाले. त्यांचे चिरंजीव सुहास यांच्याकडे त्यांची राजकीय धुरा येणार, हे जवळपास निश्‍चित आहे. ते महायुतीसमवेत राहणार, हे सध्याचे चित्र आहे.

बाबर गटाशी भाजप खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांचे फारसे सख्य नव्हते. तथापि, गत वेळी बाबर यांनी खासदार पाटील यांना मदत केली होती. त्यानंतर या दोघांमधील संबंध फारसे सुमधुर राहिले नाहीत. मात्र उघड विरोधाचे चित्र नव्हते. आता बाबर नसल्याने पुढचे राजकारण कसे राहणार, हे पुरेसे स्पष्ट नाही. विट्याचे नेते आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी काँग्रेसचा त्याग करून शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Sangli Lok Sabha Chandrahar Patil Shiv Sena
Satara Lok Sabha : कऱ्हाडच्या दोन्ही आमदारांची दिलजमाई; मतभेद विसरून पृथ्वीराज चव्हाण-बाळासाहेब पाटील आले एकत्र

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात सदाशिवरावांची ही भूमिका पुढची राजकीय लढत गृहित धरून होती. तथापि, सत्तांतरानंतर सारेच संदर्भ बदलले. दरम्यान, राष्ट्रवादीतच फूट झाल्यानंतर ही गणिते आणखी विस्कळित झाली. या नव्या फेरमांडणीत सदाशिवराव यांचे राजकीय वारस माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. सदाशिवरावांनी मात्र नेमकी जाहीर भूमिका टाळली. मात्र त्यांनी मौन पाळत वैभव पाटील यांना मोकळे रान करून दिल्याचे मानले जात आहे.

भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच संजय पाटील यांनी खानापूर तालुक्यात प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे. त्यांचे चिरंजीव प्रभाकर यांनी विट्यासह तालुक्यात पहिली संपर्क फेरी पूर्ण केली आहे. तालुक्यातील दोन्ही प्रबळ राजकीय गट बाबर-पाटील सध्या महायुतीसमवेतच असल्याने सध्या खासदार पाटील यांचे पारडे कागदावर स्पष्टपणे जड वाटत आहे. तथापि राजकारणात दोन अधिक दोन चार नसते. कारण आता चंद्रहार पाटील यांच्या रुपाने तालुक्याच्या भूमिपुत्राला जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रस्थानी येण्याची संधी मिळाली आहे.

Sangli Lok Sabha Chandrahar Patil Shiv Sena
Satara Lok Sabha : 'माझा लूक चांगला असल्याने निदान डोळा तरी मारा..; असं का म्हणाले उदयनराजे?

चंद्रहार यांचा जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून तालुक्यात चांगला संपर्क आहे. गत दोन वर्षांत त्यांनी खूपच तयारी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी प्रचाराला गती दिली आहे. तथापि, त्यांच्या उमेदवारीला अद्याप महाविकास आघाडीचा हिरवा झेंडा मिळालेला नाही. त्यांची उमेदवारी कायम राहिली तर निश्‍चितपणे तालुक्यात चांगला जनाधार मिळणार आहे. अर्थात, ही लढत तिरंगी झाली तर इथली समीकरणे १८० कोनात बदललेली असतील.

खानापूर तालुक्यात कधी काळी काँग्रेसची मोठी ताकद होती. शेतकरी कामगार पक्ष आणि डावे पक्ष विरोधात असायचे. तथापि, तालुक्यात गावागावांत आजही या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आहेत. माजी मंत्री पतंगराव कदम, माजी आमदार मोहनराव कदम आणि आमदार विश्‍वजित कदम यांना मानणारे अनेक कार्यकर्ते गावागावांत आजही आहेत.

Sangli Lok Sabha Chandrahar Patil Shiv Sena
Sangli Lok Sabha : 'सांगली' लढण्यावर काँग्रेस ठाम; शरद पवारांच्या मध्यस्थीकडं लक्ष, वादग्रस्त जागांवर अंतिम तोडगा निघणार?

रवींद्र देशमुख, सुरेश पाटील, आनंदराव पाटील, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ॲड. बाबासाहेब मुळीक आदी नेते काँग्रेसला म्हणजे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही आहेत. तसे झाले तर तालुक्यात काँग्रेसही निर्णायक मते घेईल, यात शंका नाही. अर्थात, ही लढत भाजप विरुध्द काँग्रेस की शिवसेना की तिरंगी होईल, यावर तालुक्यातील मतविभागणी ठरणार आहे. शिवाय, ही मतविभागणी आगामी विधानसभा निवडणुकीत नवी समीकरणे मांडणारी ठरू शकते. कारण कदम कुटुंबीयांसाठी खानापूर तालुका होमग्राऊंड आहे. तिथे जितेश कदम यांच्‍यासाठी यानिमित्ताने जुळवाजुळव होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com