

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांना ५ लाख ७१ हजार १३४ मते मिळाली आहेत. त्यांचा ३२ हजार ७७१ मतांनी विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रसचे शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी देखील तगडी फाईट दिली आहे. शिंदे यांना ५ लाख ३८ हजार ३६३ मते मिळाली. संजय गाडे यांच्या तुतारीसारख्या दिसणाऱ्या चिन्हामुळे शशिकांत शिंदे यांना फटक बसला आहे. संजय गाडे यांचे ट्रम्पेटमुळे चिन्हाला ३७ हजार ६२ मते मिळाली आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. हे महाराष्ट्राच्या नैऋत्येस वसलेले आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने सर्व प्रमुख प्रशासकीय कार्यालये येथे आहेत. या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवली, तर माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाकडून उमेदवार होते. शरद पवार यांचे कट्टर समर्थक शिंदे आणि छत्रपती घराण्याचे उदयनराजे यांच्यातील लढतीमुळे ही जागा हॉट सीट बनली होती.
सातारा लोकसभेत काँग्रेस पक्ष ९ वेळा तर राष्ट्रवादी काँग्रेस ६ वेळा सत्तेत आहे. ही जागा १९९९ पासून राष्ट्रवादीकडे आहे. २०१९ मध्ये या लोकसभेत मतदारांची संख्या १८,४८४,८९ होती. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ९,४५१,८२ तर महिला मतदारांची संख्या ९,०३२,९० इतकी होती.
सातारा विधानसभेत एकूण सहा जागा आहेत. या जांगावर एनडीएचे वर्चस्व आहे. या 6 जागांपैकी 4 जागांवर एनडीए आघाडीचे तर 2 जागांवर इंडिया आघाडीचे आमदार आहेत.
वाई जागेवरून मकरंद पाटील (राष्ट्रवादी अजित गट), कोरेगाव येथील महेश शिंदे (शिवसेना शिंदे), कराड उत्तर, बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार), कराड दक्षिण, पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस), पाटण, शंभूराजे देसाई (शिवसेना शिंदे), सातारा, शिवेंद्रराजे भोसले (भाजप) हे आमदार आहेत.
श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी
मते : ६,३६,६२०
उदयनराजे भोसले (भारतीय जनता पक्ष)
मते : ५,४८,९०३
सुशीलकुमार भोसेकर (अपक्ष)
मते : २६,४०७
चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी)
मते : १७,२०३
विजयी उमेदवारांचे मताधिक्य: ८७,७१७
मराठा आरक्षणाचा मुद्दा सातारा लोकसभा मतदारसंघात चांगलाच गाजला. बेरोजगारीचा मुद्दा देखील साताऱ्यात गंभीर आहे. औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग आलेले नाहीत. बेरोजगार युवकांना पुणे, मुंबईची वाट धरावी लागते. दुष्काळी परिस्थितीकडे शासन व प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष, हे मुद्दे चर्चेत होते.
सातारा लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीपेक्षा सुमारे तीन टक्क्यांनी मतदान वाढले. ६३ टक्के मतदान या मतदारसंघात झाले होते. सर्वात कमी मतदान २००९ च्या निवडणुकीत ५२.८ टक्के झाले होते, तर १९९९ च्या निवडणुकीत ७१.४१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१९ च्या निवडणुकीत ६०.४७, तर आता ६३ टक्क्यांवर मतदान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.