Satara Lok Sabha : साताऱ्याच्या उमेदवारीचं घोडं अडलं कशात? मविआ-महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर नाहीच!

श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतल्याने राष्ट्रवादीकडे (शरद पवार) तगडा उमेदवार नसल्याची स्थिती आहे.
Satara Lok Sabha
Satara Lok Sabhaesakal
Summary

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने तगडा उमेदवार देण्याची रणनीती महाआघाडी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे (Satara Lok Sabha Constituency) महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत. त्यामुळे महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे (BJP), की राष्ट्रवादीकडे (Ajit Pawar) राहणार? याबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यातच महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे (शरद पवार) असल्याचे जवळपास निश्‍चित मानले जाते. मात्र, अद्यापही त्यांच्याकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही.

खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतल्याने राष्ट्रवादीकडे (शरद पवार) तगडा उमेदवार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे ऐन वेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारी निश्‍चित होऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज आमदार चव्हाण यांची भेट घेऊन कमराबंद चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या सर्व राजकीय घडामोडीत राजकीय पक्षांचा उमेदवारीचा तिढा सुटेना, अशी स्थिती असल्याने सामान्य मतदार मात्र संभ्रमात पडल्याचेच दिसून येत आहे.

Satara Lok Sabha
..अखेर 'सांगली'बाबत उद्धव ठाकरेंनी ताठर भूमिका सोडली; काँग्रेसशी चर्चा करण्यास तयार, लवकरच निघणार तोडगा?

उमेदवारीचे घोडे नेमके अडले कुठे? अशी लोकांतून विचारणा होत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले व राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्यातच तुल्यबळ लढत होईल, असे काही दिवसांपर्यंतचे चित्र होते. मात्र, भाजपने अद्यापही उदयनराजेंना उमेदवारी जाहीर केलेली नाही. दिल्लीवारी करून आल्यावर तरी उदयनराजेंची उमेदवारी जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यानंतरच्या यादीतही साताऱ्याच्या उमेदवारीचा समावेश नाही. त्यामुळे भाजपमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात विधानसभा मतदारसंघ निहाय्य बैठक घेऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांनी श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारीच्या शर्यतीतून थांबण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्याचवेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील यांची नावे चर्चेत असल्याचे सांगितले. मात्र, विरोधात उदयनराजे संभाव्य उमेदवार असल्यास आमदार शिंदे, आमदार पाटील यांची कितपत डाळ शिजेल? हा खरा प्रश्‍न आहे. त्यामुळे तुल्यबळ उमेदवार देण्याची रणनीती महाआघाडीला आखावी लागणार आहे. या प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादीची (अजित पवार) अंतर्गत लगबग सुरू असल्याचे दिसते.

Satara Lok Sabha
Kolhapur Lok Sabha : 'कौन है यह मुन्ना, कहाँसे आया..' शरद पवारांच्या एका वाक्यावरच फिरली 2004 ची निवडणूक

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने तगडा उमेदवार देण्याची रणनीती महाआघाडी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अचानक कऱ्हाड दौरा करून आमदार चव्हाण यांची भेट घेतली. दोघांची कमराबंद चर्चा झाली. त्यातील तपशील समजला नसला, तरी सांगलीची जागा शिवसेनेला गेल्याने काँग्रेसमध्ये असलेली नाराजी किंवा साताऱ्यातील उमेदवारीच्या मुद्द्यावरूनच ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार, की काँग्रेसला जाणार? ही नव्याने चर्चा होऊ लागली आहे.

निवडणुकीसाठी १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. मात्र, अद्यापही महायुती, महाआघाडीचे उमेदवार निश्‍चित नाहीत. त्यामुळे उमेदवार निश्‍चिती होणार कधी? ते लोकांपर्यंत पोचणार कधी? त्यांना प्रचाराला किती वेळ मिळणार? याबाबत पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह इच्छुकही संभ्रमात आहेत.

Satara Lok Sabha
Sangli Loksabha: सांगलीत शिवसेना जिंकली, हरली पण वाढली नाही; 'मातोश्री'वरूनही मिळालं नाही बळ?

शिंदे गटही चर्चेत...

महायुतीतील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) इच्छुक उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांचीही सोशल मीडियावर तयारी सुरू आहे. लोकांच्या काळजावर कोरलेलं नाव कसं मिटवणार? असे प्रश्‍न उपस्थित करून यंदाच्या वर्षी फक्त पुरुषोत्तम जाधवच खासदार, असा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे या संभ्रमात आणखी भर पडल्याचे दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com