उदयनराजेंच्या उमेदवारीवरुन नवा ट्विस्ट; महाजनांनी सुरुचीवर घेतली शिवेंद्रराजेंची भेट, दोन्ही नेत्यांत बंद दाराआड चर्चा

आमदार शिवेंद्रराजे यांनी जिल्ह्यात भाजपची राजकीय ताकद वाढलेली पाहून हा मतदारसंघ भाजपलाच दिला जावा, अशी मागणी केलेली आहे.
Satara Loksabha
Satara Loksabhaesakal
Summary

'सातारा- माढाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपची नेमकी काय परिस्थिती आहे, याची माहिती घेण्यासाठी मी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलो आहे.'

सातारा : जिल्ह्यात भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ (Satara Loksabha Constituency) हा भाजपकडेच (BJP) राहावा, अशी आग्रही मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे केली. दरम्यान, दोन्ही नेत्यांत आज बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील सांगण्यास दोघांनीही नकार दिला.

Satara Loksabha
Satara Loksabha : भाजपनं उदयनराजेंचं तिकीट कापलं? महाजन म्हणाले, 'राजेंनी तिकीट मागण्याची गरज नाही..'

माढा, सातारा व पुणे या तीन लोकसभा मतदारसंघांतील तिढा व भाजपअंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी काल माढा लोकसभा मतदारसंघाचा (Madha Loksabha Constituency) दौरा केला. त्यानंतर ते साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केल्यानंतर मंत्री महाजन यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची त्यांच्या सुरुची या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच दोघांनी बंद दाराआड विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेनंतर मंत्री महाजनांनी पत्रकारांशी संवाद साधला. गिरीश महाजन म्हणाले, ‘‘सातारा- माढाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपची नेमकी काय परिस्थिती आहे, याची माहिती घेण्यासाठी मी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलो आहे. आमच्याकडे इच्छुक अनेक आहेत, ते पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत.’’

Satara Loksabha
Kolhapur Loksabha : 'शरद पवार गटाचे बडे नेते लवकरच भाजपमध्ये येणार'; महाडिकांच्या दाव्याने पश्‍चिम महाराष्ट्रात खळबळ

संकटमोचक म्हणून ओळखले जाता, मग सातारा लोकसभेचा तिढा सुटला म्हणायचे का, असे विचारले असता यावर महाजन म्हणाले, की असे म्हणता येत नाही, अजून अर्ज दाखल करण्यास सुरुवात नाही, असे चुटकीसरशी काहीही होत नाही. शिवेंद्रसिंहराजेंच्या मनात काय ते मलाही माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले, तर एकीकडे उमेदवारीसाठी सर्व इच्छुक पक्ष श्रेष्ठींकडे जातात; पण साताऱ्यात सर्व इच्छुक शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेत आहेत, यामागचे नेमके कारण काय, या प्रश्नावर महाजन हसले; पण शिवेंद्रसिंहराजेंनी मात्र, इथला चहा चांगला असतो, असे सांगताच एकच हस्या पिकला.

गिरीश महाजन म्हणाले, ‘‘आमदार शिवेंद्रराजे यांनी जिल्ह्यात भाजपची राजकीय ताकद वाढलेली पाहून हा मतदारसंघ भाजपलाच दिला जावा, अशी मागणी केलेली आहे. त्यांचा हा निरोप वरिष्ठापर्यंत निश्चितपणे पोचवला जाईल.’’ या वेळी राजू भोसले, अविनाश कदम, भाजपचे लोकसभा समन्वयक सुनील काटकर, फिरोज पठाण, अजित साळुंखे, बाळू खंदारे, अमोल मोहिते आदी उपस्थित होते.

Satara Loksabha
Kolhapur Loksabha : 'झालं गेलं विसरून लोकसभेला सहकार्य करा'; खासदार मंडलिकांचं केपींना भावनिक आवाहन

शिवेंद्रसिंहराजेंना लोकसभेत नाही रस : महाजन

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीत अजिबात रस नाही. या चर्चेच्या दरम्यान शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे राहिला पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. त्याचबरोबर साताऱ्यातून कोणाला तिकीट द्यायचे, हा सर्वस्वी निर्णय पक्षाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com