Sharad Pawar : लोकशाहीत विरोधकांना सन्मान द्यायचा असतो ; ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भाजपवर टीका

‘‘लोकशाहीत सत्ताधारी पक्षाने विरोधकांना सन्मान द्यायचा असतो. जवाहरलाल नेहरू यांच्यासह सर्व पंतप्रधानांनी संसदेत विरोधकांचा सन्मान केला.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal

पुणे : ‘‘लोकशाहीत सत्ताधारी पक्षाने विरोधकांना सन्मान द्यायचा असतो. जवाहरलाल नेहरू यांच्यासह सर्व पंतप्रधानांनी संसदेत विरोधकांचा सन्मान केला. देशात एकही विरोधी पक्षाचा नेता निवडून येऊ द्यायचा नाही, असे मोदी आपल्या भाषणात सांगतात. पुतीन व नरेंद्र मोदी यांच्यात काहीही अंतर नाही, असे संजय राऊत बोलतात, ते योग्य आहे असे वाटू लागले आहे,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर टीका केली.

भाजपचे खेड तालुका समन्वयक अतुल देशमुख यांनी गुरुवारी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, जयसिंगराव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे, प्रशांत जगताप, अंकुश काकडे उपस्थित होते. ‘‘एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधान होण्यापूर्वी कॉंग्रेस पक्षाची बैठक झाली, तेव्हा काँग्रेस व त्यांच्यासमवेतचे सर्व घटक पक्ष उपस्थित होते. त्यावेळी बहुमत नसताना सत्तेचा स्वीकार करणे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे तेव्हा पंतप्रधानपदाबाबत निर्णय घेण्याचा प्रश्‍नच नव्हता,’’ असे प्रत्युत्तर त्यांनी प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या टीकेला दिले.

‘‘राज ठाकरे यांनी १५ वर्षांत तीन ते चार भूमिका घेतल्या. आता आणखी काही वेगळे करतात का, ते पाहू,’’ असा टोलाही त्यांनी लगावला. एकनाथ खडसे यांच्याबद्दल ते म्हणाले, ‘‘खडसे यांच्या खूप चौकशा झाल्या. त्यामुळे ते हतबल झाले होते. त्यांनी चर्चा केली, तेव्हा तुम्ही गेलात तरी आमची गैरसोय होणार नाही, असे आम्ही त्यांना सांगितले.’’

धैर्यशील मोहिते पाटलांचा दोन दिवसांत पक्षप्रवेश

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी चर्चा झालेली नाही, मात्र येत्या दोन दिवसांत ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील. विजयदादा मोहिते पाटील हे सध्या शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत. तेथील प्रत्येक निर्णय हा त्यांच्या संमतीनेच होतो, असे सांगून पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारीबाबत अधिक बोलणे टाळले.

Sharad Pawar
Pune Leopard News : पालकांच्या कुशीतील बालिकेला बिबट्याने पळवले

बाहेरून आलेला पवार... फरक ओळखा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात बारामतीकरांनी आता सुनेला निवडून द्या, पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन केले होते, त्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर पवार यांनी ‘‘अजित पवार हे काहीही चुकीचे बोलले नाहीत. मूळ पवार आणि बाहेरून आलेला, हा फरक ओळखा,’’ अशी कोटी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com