Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

‘‘बारामतीच्या निवडणुकीची उत्सुकता अमेरिकेतसुद्धा आहे. तुमच्या निर्णयाचे महत्त्व महाराष्ट्राबरोबरच बाहेरच्या लोकांनाही आहे. कोणी काही म्हणो; देशाची सत्ता कुणाच्याही ताब्यात असो.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal

काटेवाडी : ‘‘बारामतीच्या निवडणुकीची उत्सुकता अमेरिकेतसुद्धा आहे. तुमच्या निर्णयाचे महत्त्व महाराष्ट्राबरोबरच बाहेरच्या लोकांनाही आहे. कोणी काही म्हणो; देशाची सत्ता कुणाच्याही ताब्यात असो. जोपर्यंत आपण सर्वजण एक आहोत, तोपर्यंत बारामतीकरांना कोणीही धक्का लावू शकत नाही. तुमचा निर्णय बारामतीच्या व महाराष्ट्राच्या हिताचा होईल, अशी मला खात्री आहे,’’ असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी (ता. ५) येथे व्यक्त केला.

बारामतीमधील जुना मोरगाव रस्त्यावरील लेंडी पट्टी येथील मैदानावर महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार पुढे म्हणाले, ‘‘मागील अनेक वर्षे आपण शेवटची सांगता सभा मिशन हायस्कूलच्या प्रांगणात घेत होतो.

यंदा ते शक्य झाले नाही. राज्याची सत्ता ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांनी ती जागा ताब्यात घेतली. त्यामुळे फारसा फरक पडत नाही. त्यात आपले काही नुकसान झाले नाही. येथे प्रचंड संख्येने सर्वसामान्य माणूस विशेषत: तरुण एकवटला आहे. ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. कण्हेरी येथे आपल्या प्रचाराची पहिली सभा झाली. त्यावेळी तेथे अमेरिकेहून एक व्यक्ती आले होते. त्यांनी सांगितले, की भारतातील लोकसभा निवडणुकीबाबत आमच्याकडे उत्सुकता आहे. एका वृत्तपत्राने मला येथे पाठवले आहे, असे ते म्हणाले. हा माणूस न्यूयॉर्कवरून कण्हेरीला आला. त्यामुळे तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे महत्त्व मोठे आहे.’’ यावेळी बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड आदी तालुक्यांतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मागील अनेक निवडणुकांमध्ये अशा प्रकारची सांगता सभा आम्ही पाहिली नाही, अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.

कुटुंबीय, कार्यकर्ते हळहळले

मागील काही दिवसांपासून शरद पवार राज्यभर सभा घेत आहेत. त्याचा ताण त्यांच्या प्रकृतीवर रविवारी दिसून आला. भाषणामध्येही त्यांनी आपला घसा बसल्याचा उल्लेख केला. चेहऱ्यावरही थकवा जाणवत होता. भाषणासाठी पवार उभे राहताच कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. घसा बसल्यामुळे पवार यांना स्पष्टपणे बोलता येत नव्हते. त्यांचा आवाज ऐकून अनेक कार्यकर्ते व पवार कुटुंबीयही हळहळले.

प्रतिभा पवारांच्या हातात शरद पवारांचा फोटो

सभेला पवार कुटुंबीय उपस्थित होते. त्यात शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या हातामध्ये शरद पवार यांचा फोटो होता. संपूर्ण पवार कुटुंब शरद पवार यांच्या पाठीशी आहोत, असा संदेश प्रतिभा पवार यांनी दिला.

मोठा भाऊ म्हणून नेहमी सन्मान केला. नेहमी एक पाऊल मागे उभी राहिले. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. आणि आज त्या माझ्या वागण्यावर तुम्ही टीका करता. दहा वर्षात काहीच केले नाही, असे आरोप माझ्यावर करता. हे आरोप मला मान्य नाहीत. त्याला मी उत्तर देत बसणार नाही. कारण, सत्य त्यांना माहिती आहे आणि मलाही माहिती आहे.

- सुप्रिया सुळे

शरद पवार म्हणाले...

  • महागाई, बेरोजगारी, शेती असे अनेक प्रश्न

  • सत्ताधारी प्रश्न सोडविण्यासाठी

  • सत्तेचा वापर करत नाहीत

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व मित्र पक्षाचे सर्व उमेदवार निवडून देशाला नवी दिशा देण्याचे काम आपण करावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com