Sharad Pawar : ...आणि शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला!

महाराष्ट्रात देखील खूप राजकीय अनागोंदी सुरू होती. पाच वर्षात चार मुख्यमंत्री बदललेले राज्याने पाहिले. मुख्यमंत्रीपदाच्या संगीत खुर्चीची सुरवातच शरद पवारांच्या पुलोद प्रयोगापासून झाली होती. वसंतदादांचे सरकार पाडून मुख्यमंत्री बनलेल्या शरद पवारांना स्वतःची खुर्ची फारकाळ टिकवता आली नाही.
sharad pawar merge in  congress rajiv gandhi
sharad pawar merge in congress rajiv gandhisakal

ऐंशीचे दशक म्हणजे राजकारणाचा स्थित्यंतराचा काळ. आणीबाणीच्या अंधकारमय कालखंडातून भारतीय लोकशाही तलावून सुखावून बाहेर पडली होती. जनता पक्षाचा पुरता बीमोड करून इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या होत्या. संजय गांधींच्या अपघाती मृत्यू नंतर काँग्रेसच्या राजकारणात राजीव गांधींचा उदय होत होता.

महाराष्ट्रात देखील खूप राजकीय अनागोंदी सुरू होती. पाच वर्षात चार मुख्यमंत्री बदललेले राज्याने पाहिले. मुख्यमंत्रीपदाच्या संगीत खुर्चीची सुरवातच शरद पवारांच्या पुलोद प्रयोगापासून झाली होती. वसंतदादांचे सरकार पाडून मुख्यमंत्री बनलेल्या शरद पवारांना स्वतःची खुर्ची फारकाळ टिकवता आली नाही.

पुढे अंतुले, बाबासाहेब भोसले आणि पुन्हा वसंतदादा पाटील असे चार मुख्यमंत्री बदलले गेले होते. काँग्रेसची शकले झाली होती. शरद पवार तेव्हा समाजवादी काँग्रेसचे नेतृत्व करत होते.

साल 1984. पंजाबमधील खलिस्तान वाद्यांचा असंतोष उफाळून आला अन् या लाटेत खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा बळी गेला. संपूर्ण देश हादरला. सुवर्ण मंदिरावर केलेली लष्करी कारवाई इंदिरा गांधींना महागात पडली होती. इंदिरा गांधींचे वारसदार म्हणून राजीव गांधी यांच्याकडे काँग्रेस व पर्यायाने देशाची जबाबदारी येऊन पडली होती.

शरद पवार आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात सांगतात, इंदिराजींच्या अंत्यसंस्कारावेळी मी दिल्लीला गेलो. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन राजीव गांधी यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्यापाशी गेलो. आईच्या क्रूर हत्येनं व्यथित झालेले, पंतप्रधानपदाची जबाबदारी अकाली अंगावर पडलेले राजीवजी त्याही स्थितीत शांत चित्तानं उभे होते. मी त्यांचा हात हातात घेऊन माझ्या संवेदना प्रकट केल्या. त्यावर त्यांनी, "शरद, काळ खूप नाजूक आहे. देशासाठी आपण एकत्र काम करायला हवं." असं म्हटलं. तो प्रसंग अधिक बोलण्याचा, विशेषतः राजकीय विषयावर बोलण्याचा तर मुळीच नव्हता. मी हलकेच त्यांचा हात दाबला आणि बाजूला झालो.

sharad pawar merge in  congress rajiv gandhi
Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

शरद पवार सांगतात की राजीव गांधी यांची त्यांच्याबरोबर काम करावं, अशी इच्छा असली; तरी त्यांचा राजकीय मार्ग निश्चित झाला होता. 'समाजवादी काँग्रेस'च्या राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व शरद पवारांकडे होते आणि राज्यपातळीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी ते महाराष्ट्र पालथा घालत होते. राजीव गांधी आणि शरद पवार यांची राजकीय वाट वेगळी असली, तरी त्या भेटीनं उभयतांच्या मनातलं मळभ दूर झालं होतं.

पेटलेला पंजाब शांत करण्यासाठी शीख समुदायाचा विश्वास परत मिळवणं, हे राजीव गांधींच्या समोरच सर्वात मोठं आव्हान होतं. कठीण काळात पंजाब प्रश्नाची कोंडी फोडण्यासाठी त्यांनी शरद पवार यांची मदत घेतली. त्यामुळे त्यांच्यातील विश्वासाचा अनुबंध आकाराला आला होता. शरद पवार हे लोकसभेचे खासदार असल्यामुळे तिथेही दोघांच्यातील सुसंवादाच्या संधी वारंवार येत होत्या.

शरद पवार म्हणतात आमच्यातलं हे व्यक्तिगत नातं 'काँग्रेस'च्या पातळीवरही यावं असं राजीवजींना वाटत होतं. हे थोड्याच काळात स्पष्ट होऊ लागलं.

sharad pawar merge in  congress rajiv gandhi
Sharad Pawar: 'मी असं बोललेलो नाही'; शरद पवारांचे प्रादेशिक पक्षांबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

इंदिरा गांधींचे राजकीय सचिव पी. एन. धर यांचा मुलगा विजय हा राजीव गांधींच्या घनिष्ठ मित्रांपैकी एक होता. शरद पवारांचे त्याच्याशी चांगले संबंध होते त्यामुळे पवारांना 'काँग्रेस'मध्ये परतण्याविषयीच्या प्राथमिक बोलण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती.

शरद पवार आपल्या आत्मचरित्रात सांगतात की हा संवाद सुरू होण्यापूर्वीच पक्षातल्या सहकाऱ्यांची मतं मी आजमावली होती. आपण मुख्य प्रवाहात जायला हवं, असा त्यांचाही सूर होता. राजीवजींची देहबोली आणि प्रत्यक्ष वागणूक अत्यंत मित्रत्वाची आणि कळकळीची होती. मुख्य प्रवाहात जावं अशी सकारात्मक मानसिकता आमचीही होती, शिवाय नॅशनल कॉन्फरन्सच्या फारूख अब्दुल्ला यांचाही प्रेमळ तगादा होता त्यामुळे अखेर आम्ही काँग्रेस मध्ये परतण्याचा निर्णय घेतला.

समाजवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा फटका मराठवाड्यात बसण्याची शक्यता जाणकार राजकीय विश्लेषकांनी केली होती त्यामुळे शरद पवारांनी मराठवाडा पिंजून काढायचं ठरवलं. कार्यकर्त्यांची भेट घेतली, तिथल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात फिरले. ''काँग्रेस'मध्ये आपल्या पक्षाच्या विलीनीकरणाचा कार्यक्रम औरंगाबादलाच करायचा.' हा निर्णय शरद पवारांनी या दौऱ्यानंतर घेतला.

sharad pawar merge in  congress rajiv gandhi
Sharad Pawar : विलीनीकरणावरून टीकेच्या फैरी; शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे खळबळ

शरद पवार सांगतात माझ्या 'काँग्रेस'मधल्या विलीनीकरणाच्या हालचाली सुरू असताना शंकरराव चव्हाण, विठ्ठलराव गाडगीळ यांचा त्याला थंड प्रतिसाद होता. त्यांना हा निर्णय अजिबात आवडला नव्हता. परंतु तो राजीव गांधी यांच्या पातळीवरच घेतला गेल्यानं त्यांना उघड विरोध करता येत नव्हता, एवढंच.

औरंगाबाद इथे 'समाजवादी काँग्रेस'चं इंदिरा काँग्रेसमध्ये विलीनीकरण झालं. त्या सभेला पाच लाखांचा जनसमुदाय लोटला. शंकरराव चव्हाण, प्रदेशाध्यक्षा प्रभा राव, 'काँग्रेस'चे अखिल भारतीय सरचिटणीस जी. के. मूपण्णार, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आदी मंडळी उपस्थित होती. एखाद्या पक्षाच्या विलीनीकरणासाठी पंतप्रधान असलेल्या पक्षाध्यक्षानं उपस्थित राहणं लक्षणीय होतं. 'शरद पवार यांचा आपण सन्मानानं पक्षात पुनर्प्रवेश करून घेतो आहोत,' हा संदेश राजीव गांधी यांना द्यायचा असल्यामुळेच ते या सोहळ्याला उपस्थित राहिले.

sharad pawar merge in  congress rajiv gandhi
Sharad Pawar गट Congress मध्ये विलीन होणार? Mangaldas Bandal यांची पुडी, Prashant Jagtap यांनी फोडली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com