साताऱ्याचा उमेदवार आज ठरणार? शरद पवार साधणार 200 कार्यकर्त्यांशी संवाद, 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी उमेदवार निश्चित झाल्याचे सांगत काल शक्तिप्रदर्शन केले.
Satara Lok Sabha Constituency
Satara Lok Sabha Constituencyesakal
Updated on
Summary

ऐन वेळी क्लीन चेहरा म्हणून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे; पण ते लढण्यास इच्छुक नाहीत.

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे आज (शुक्रवारी) साताऱ्यात येत आहेत. या वेळी ते पक्षाच्या दोनशे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून साताऱ्याच्या उमेदवारीबाबत एकमत घेणार आहेत. त्यानंतर कदाचित उमेदवाराच्या नावाची घोषणाही त्यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांच्या सातारा दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Satara Lok Sabha Constituency
Satara Loksabha : 'मी कमळाच्या चिन्हावरच लढणार, माझ्या उमेदवारीविषयी शंका नको'; उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं

सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha Constituency) महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी उमेदवार निश्चित झाल्याचे सांगत काल शक्तिप्रदर्शन केले, तसेच निवडणूक कमळ चिन्हावरच लढणार असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीत साताऱ्याची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे खासदार शरद पवार साताऱ्यातून कोणाची उमेदवारी जाहीर करणार याची उत्सुकता आहे.

Satara Lok Sabha Constituency
काँग्रेस मैत्रीपूर्ण लढतीला तयार, पण 'सांगली'च्या लढतीतून माघार घेणार नाही; विश्‍वजित कदम यांचा थेट इशारा

त्यासाठी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून इच्छुकांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करून घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोनशे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी ते सकाळी अकरा वाजता साई सम्राट मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे साताऱ्यातील शरद पवारांचा हा दौरा उमेदवार निश्चितीसाठीच असल्याचे मानले जात आहे. सध्या सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सुनील माने, सत्यजित पाटणकर, सारंग पाटील यांची नावे इच्छुकांत आहेत.

तर, ऐन वेळी क्लीन चेहरा म्हणून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे; पण ते लढण्यास इच्छुक नाहीत. अद्यापपर्यंत राष्ट्रवादीतील एकाही इच्छुकाच्या नावावर एकमत झालेले नाही. सर्व इच्छुकांची मते खासदार शरद पवार यांनी यापूर्वीच जाणून घेतली आहेत. आता पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेऊन ते कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करायचे हे निश्चित करणार आहेत. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या सर्व आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळेस साताऱ्यातून स्वत: शरद पवार यांनी निवडणूक लढावी, अशी आग्रही मागणी मागील तीन ते चार बैठकांत केली.

Satara Lok Sabha Constituency
Sangli Lok Sabha : काँग्रेसचा होतोय 'बाहुबली', 'कटप्पा'च्या भूमिकेत कोण? राजकीय वर्तुळात चर्चा

पुरुषोत्तम जाधव भेट घेण्याची शक्यता

शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव हे सातारा लोकसभेसाठी इच्छुक आहेत; पण हा सातारा मतदारसंघासाठी भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेला बाजूला ठेवल्याची स्थिती आहे. परिणामी पुरुषोत्तम जाधव हे नाराज असून, त्यांनी मध्यंतरी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे उद्याच्या पवारांच्या दौऱ्यात पुरुषोत्तम जाधव ही शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com