Solapur Constituency Lok Sabha Election Result: लेकीनं घेतला बापाच्या पराभवाचा बदला! मोदी, योगी येऊनही सातपुतेंचा पराभव, प्रणिती शिंदे विजयी...

Praniti Shinde won Solapur Lok Sabha Election Result 2024 : २०१९ च्या तुलनेत सोलापुरात ०.७४ मतांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत ५८.४५ टक्के मतदान झाले होते.
Solapur Constituency Lok Sabha Election Result
Solapur Constituency Lok Sabha Election Result

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने भाजपचा विजयरथ रोखला आहे. काँग्रेसनेते सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार प्रणिती शिंदे यांना ६ लाख २० हजार २२५ मते मिळाली आहे. तर राम सातपुते यांना ५ लाख ४६ हजार ०२८ मते मिळाली. प्रणिती शिंदे यांचा ७४ हजार १९७ मतांनी विजयी झाला आहे.

गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून यावेळी दोन तगडे आमदार रिंगणात होते. गांधी घराण्याचे विश्वासू माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे भाजपच्या या बालेकिल्ल्यात घुसण्यासाठी रिंगणात उतरल्या आहेत. तर प्रत्येक वेळी उमेदवार बदलण्याची परंपरा पुढे नेत भाजपने पुन्हा आमदार राम सातपुते यांच्या रूपाने नव्या चेहऱ्यावर संधी दिली होती. दोघेही तरुण उमेदवार आहेत. एकीकडे वारसा जतन करण्याचे आव्हान होते तर दुसरीकडे किल्ला सुरक्षित ठेवण्याचे आव्हान होते.

Solapur Constituency Lok Sabha Election Result
Maharashtra Lok Sabha Election Results Live : मतमोजणीला सुरुवात, उत्तर मुंबईमधून पियूष गोयल आघाडीवर

कर्नाटक आणि तेलंगणाला लागून असलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला होता. आणीबाणीच्या काळातही येथे काँग्रेसला कोणीही हादरवू शकले नाही, मात्र गेल्या १० वर्षांत भाजपने येथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे यांचा भाजपकडून दोनदा पराभव झाला आहे. मोदी लाटेत २०१४ मध्ये निवडणूक हरल्यानंतर माजी मुख्यमंत्री शिंदे यांना २०१९ मध्ये दुसरा धक्का बसला होता.

विधानसभेवर कुणाचे वर्चस्व -

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहा लोकसभा आहेत. सोलापूर-उत्तर भाजपचे विजयकुमार देशमुख आमदार आहेत. सोलापूर मध्य काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, सोलापूर दक्षिण भाजपचे सुभाष देशमुख, मोहोळ विधानसभेत अजित पवार गटाचे यशवंत माने, अक्कलकोटमध्ये भाजपचे सतिन शेट्टी, तर पंढरपूरमध्ये समाधान आवताडे भाजपचे आमदार आहे. म्हणजे महायुतीचे विधानसभेवर वर्चस्व आहे.

२०२४ लोकसभा किती मदतान झाले?

२०१९ च्या तुलनेत सोलापुरात ०.७४ मतांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत ५८.४५ टक्के मतदान झाले होते. मंगळवारी (ता.७) लोकसभा निवडणूक २०२४ साठी झालेल्या मतदान प्रक्रियेत ५९.१९ टक्के मतदान झाले आहे. सोलापुरात २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये ०.७४ टक्के मतांची वाढ झाली आहे.

सोलापूर मतदारसंघात १९९१ मध्येच ६१.४८ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर २००२ मध्ये ५५.४२, २००९ मध्ये ४६.६२, २०१४ मध्ये ५५.८८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत सोलापूरचा टक्का ६० च्या जवळ आहे.

२०१९ मतदान-

२०१९ मध्ये भाजपकडून डॉ.जयसिध्देश्‍वर महास्वामी विजयी झाले होते. त्यांना ५,२४,९८५ मते मिळाली होती. तर सुशीलकुमार शिंदे, (काँग्रेस) यांना ३,६६,३७७ मते मिळाली होती. ॲड. प्रकाश आंबेडकर, (वंचित) मते : १,७०,००७ तर नोटा ६,१९१ मते मिळाली होती.

Solapur Constituency Lok Sabha Election Result
India Lok Sabha Election Results Live : देशात मतमोजणी सुरू... 5 मिनिटात पहिला कल हाती! भाजपा 8 तर इंडिया 6

कोणते मुद्दे गाजले -

मराठा, धनगर आरक्षण आंदोलन सोलापूर लोकसभेत चांगलेच गाजले. या मतदार संघात लिंगायत, तेलुगू भाषिक जास्त प्रमाणात आहेत. तर ग्रामीण भागात मराठा व धनगर समाज आहे. भाजपच्या दोन्ही खासदारांकडून अपेक्षाभंग झाल्याची चर्चा सोलापुरात होती. बाहेरील उमेदवार देण्याची भाजपवर नामुष्की ओढवली होती. दोन वेळा सत्ता देवूनही विमानसेवा, उद्योग नसल्याने भाजपवर टीका झाली. विडी कामागारांचे मोठे प्रश्न मतदारसंघात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com