Loksabha Election 2024 : बारामतीत ताई विरुद्ध वहिनी

शरद पवार यांच्या गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी,अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार मैदानात,नगरमधून लंके, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हेंना संधी
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sakal

मुंबई : बारामती मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार’ गटाकडून सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) सुनेत्रा पवार यांच्या नावांची आज घोषणा करण्यात आली. अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या मतदारसंघात ‘सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्रावहिनी’ अशी लढत पाहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळे या त्यांच्या चुलत बहीण आहेत.

कार्यकर्त्यांमध्ये खा. सुप्रिया सुळे यांची ताई अशी ओळख आहे तर सुनेत्रा पवार या वहिनी म्हणून ओळखल्या जातात. बारामतीमधून ही दोन्ही नावे अपेक्षित असली तरी मधल्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचे नाव पुढे आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन परभणीतून महादेव जानकर यांच्या नावाची घोषणा केली.

त्यानंतर काही वेळाने ‘राष्ट्रवादी’च्या शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पत्रकार परिषद झाली, त्यात त्यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. सुळे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी पुन्हा तातडीने पत्रकार परिषद बोलावली आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीमध्ये अपेक्षेप्रमाणेच नावे आली असून सातारा, माढा, नाशिक या वाद्‍ग्रस्त जागा मागे ठेवण्याचे धोरण दोन्ही पक्षांनी अवलंबिलेले दिसते. गेले काही आठवडे ज्या नावांची चर्चा सुरू होती त्याच नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. विजय शिवतारे यांची माघार

Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 : भाजपच्या आठव्या यादीमध्ये आयाराम ; परनीत कौर, भर्तृहरी महताब यांना संधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात आवाज उठविणारे शिवसेनेचे (शिंदे गट) नेते विजय शिवतारे यांनी आता बंडाचे निशाण खाली ठेवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार  यांनी केलेली शिष्टाई फळाला आली आहे. लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण तह केला असून, पुरंदरच्या इतिहासातला हा दुसरा तह असल्याचे स्पष्टीकरण शिवतारे यांनी दिले आहे. ‘बारामतीमधून मी माघार घेत आहे,’ असे त्यांनी जाहीर केले.

अशाही लढती

आज झालेल्या घोषणांमुळे बारामतीतून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील, परभणीतून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) संजय जाधव विरुद्ध ‘रासप’चे महादेव जानकर, वर्ध्यातून भाजपचे रामदास तडस विरुद्ध ‘राष्ट्रवादी’चे अमर काळे, ‘दिंडोरी’मधून ‘भाजप’च्या भारती पवार विरुद्ध ‘राष्ट्रवादी’चे भास्करराव भगरे, अहमदनगरमधून भाजपचे डॉ. सुजय विखे-पाटील विरुद्ध ‘राष्ट्रवादी’चे नीलेश लंके लढती निश्चित झाल्या आहेत. रायगडमधून सुनील तटकरे आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) अनंत गीते यांच्यातील लढत आधीच निश्चित झाली आहे.

  • मतदारसंघ महायुती महाविकास आघाडी

  • पुणे मुरलीधर मोहोळ -रवींद्र धंगेकर

  • बारामती सुनेत्रा पवार- सुप्रिया सुळे

  • मावळ श्रीरंग बारणे -संजोग वाघेरे

  • शिरूर ** डॉ. अमोल कोल्हे

भगरेंच्या नावानंतर वादावर पडदा

भास्करराव भगरे यांचे नाव आधीपासून चर्चेत होते. मात्र कालपासून अचानक विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांचे नाव चर्चेत आल्यामुळे उत्कंठा वाढली होती. मात्र भगरे यांचे नाव जाहीर झाल्यामुळे त्यावर पडदा पडला. परभणीची जागा महायुतीमध्ये ‘राष्ट्रवादी’ च्या (अजित पवार गट) कोट्यातील होती. ती जागा जानकर यांना देण्यात आली. बारामती मतदारसंघातील धनगर समाजाची मते सुनेत्रा पवार यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून अजित पवार गटाने ही चाल खेळल्याचे मानण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com