Loksabha Election Result : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात घड्याळ पडले मागे

शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार चेतन तुपे याच पक्षाचे आहेत. असे असूनही यंदाच्या निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य घेण्यात अपयश आले.
Loksabha Election Result
Loksabha Election Resultsakal

शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार चेतन तुपे याच पक्षाचे आहेत. असे असूनही यंदाच्या निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य घेण्यात अपयश आले. मताधिक्य घेणे दूरच; साधी बरोबरीही साधता आली नाही. याउलट महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना येथून १३ हजार ३८९ मतांची आघाडी मिळाली आहे.

सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही आढळराव आणि कोल्हे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. त्यावेळी आढळराव शिवसेनेचे उमेदवार होते. त्यांनी उमेदवारीसाठी पक्ष बदलला असला; तरी तेव्हाही ते युतीचे आणि आताही महायुतीचेच उमेदवार होते. सन २०१९मध्ये याच विधानसभा मतदारसंघात आढळराव यांना केवळ पाच हजार मतांचे मताधिक्‍य मिळाले होते. आताही युती किंवा महायुती तीच, उमेदवारही तेच; पण मताधिक्य मात्र कमी झाले आहे. त्यावेळी कमी मते मिळालेल्या कोल्हे यांना यंदाच्या निवडणुकीत १३ हजार ३८९ एवढे मताधिक्य मिळाले. यावरून मतदारांनी उमेदवारांना नव्हे; तर पक्षांना मते देताना खांदेपालट केल्याचे दिसून आले आहे.

गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून कोल्हे यांना आढळराव यांच्यापेक्षा पाच हजार मते कमी मिळाली होती. त्यामुळे कोल्हे यांची हडपसरवर भिस्त होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसनेही जय्यत तयारी केली होती. विद्यमान आमदार, एक माजी महापौर, एक उपमहापौर आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर अजित पवार यांची करडी नजर होती. कारण अजित पवार यांनी शिरूर लोकसभेची निवडणूक बारामतीप्रमाणेच प्रतिष्ठेची केली होती.

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्‍य मिळेल, असा अजित पवार यांचा अंदाज होता, तो निष्फळ ठरला. आढळराव पक्षाने आयात केलेले उमेदवार होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आढळराव यांचे मनापासून न केलेले काम, मतदारसंघातील परंपरागत माळी समाजाची मते कोल्हेंच्या बाजूला गेल्यानेच आढळराव यांना मोठी पिछाडी मिळाली.

Loksabha Election Result
Pune Loksabha Result : वसंत मोरे यांच्यासह ३३ जणांची अनामत जप्त

याशिवाय मित्रपक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेने आढळराव यांचे मनापासून काम केलेले नाही, हेच त्यांना मिळालेल्या मतांतून स्पष्ट होते. याशिवाय आढळराव यांना महायुतीचे उमेदवार असल्याने दलित आणि मुस्लिम समाजाची मतेही मिळू शकली नाहीत. हीच मते कोल्हे यांच्याकडे वळल्याने त्यांचे मताधिक्य वाढले. अगदी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत आढळराव या मतदारसंघातून पिछाडीवर होते. एकाही फेरीत त्यांना आघाडी मिळू शकली नाही. याचाच अर्थ आढळराव यांना या मतदारसंघातील सर्वच भागांमध्ये कोल्हे यांच्यापेक्षा कमी मते मिळाली आहेत.

विधानसभेतही परिणाम?

या निकालाचे परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला भोगावे लागण्याची शक्यता आहे. कारण हीच स्थिती कायम राहिल्यास हडपसर विधानसभाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी विद्यमान आमदार चेतन तुपे यांची पुढील आमदारकी धोक्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com