Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabhaesakal

Kolhapur Lok Sabha : वीरेंद्र मंडलिकांचं छत्रपती घराण्यावर खळबळजनक विधान; म्हणाले, समरजितसिंह घाटगेच खरे..

कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराज तुमच्या-आमच्यासाठी दैवत आहेत.
Summary

राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने एकही उद्योग छत्रपती कुटुंब काढू शकले नाहीत. छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केलेले नाही.

कागल : ‘त्या’ घराण्याने राजर्षी शाहू महाराजांच्या (Shahu Maharaj) नावाला साजेसे काम केलेले नाही. ते काम जनक घराणे म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजितसिंह घाटगे यांनी केले आहे. राजर्षी शाहूंच्या नावाने काढलेला त्यांचा एक उद्योग दाखवा. अनेक वर्षे झाली बंद पडलेली शाहू मिल त्यांना चालू करता आलेली नाही. विक्रमसिंह घाटगेंनी आपल्या आयुष्यात राजर्षीचा मूलमंत्र जपला. त्यांनी शाहू साखर कारखाना काढला. त्यामुळे राजर्षी शाहूंचे खरे वारसदार त्यांच्या जनक घराण्याचे समरजितसिंह घाटगे आहेत,’ असे खळबळजनक विधान खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी करत छत्रपती घराण्यावर निशाणा साधला.

Kolhapur Lok Sabha
'लोकसभे'त सात कुटुंबांचेच वर्चस्व! 1977 पासूनचा इतिहास; कोल्हापुरातून गायकवाड-मंडलिक सर्वाधिक वेळा खासदार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल येथे राजे आणि मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते (Virendra Mandlik) बोलत होते. या मेळाव्यास भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे प्रमुख उपस्थित होते. वीरेंद्र मंडलिक म्हणाले, ‘कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराज तुमच्या-आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांचे जनक घराणे म्हणून समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांच्याकडे आम्ही पाहतो.

Kolhapur Lok Sabha
Sadabhau Khot : 'मंत्रिपद गेलं, गाडीवालं पन गेलं, गाड्या बी गेल्या, आता मला च्याबी प्याला कोण बोलवत नाही'

शाहू कारखाना (Shahu Factory) कशा पॅटर्नमध्ये काम करतो, याच्याकडे बघून आम्ही काम करतो. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने एकही उद्योग छत्रपती कुटुंब काढू शकले नाहीत. छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केलेले नाही. ते काम जनक घराणे म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजितसिंह घाटगे यांनी केले आहे.’ समरजितसिंह घाटगे यांचेही यावेळी भाषण झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com