Minister Hasan Mushrif
Minister Hasan Mushrif esakal

Kolhapur Loksabha : 'अब की बार 400 पार' एवढंच मला माहीत आहे, राज्यात कुठलीही जागा धोक्यात नाही : हसन मुश्रीफ

‘आप की बार ४०० पार’ एवढेच मला माहीत आहे. कुठलीही जागा धोक्यात नाही.’
Summary

'शिवसेना व अजित पवार गटाची भाजप नेत्यांची बैठक आज दिल्लीत होत आहे, त्यात हा तोडगा निघेल.’

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी (Kolhapur Loksabha Elections) भाजपच्या वाट्याला आलेल्या जागांचे वाटप झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील जागा वाटपाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी मुंबईत बैठक होत असून, त्यात हा तिढा सुटेल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली.

जिल्हा बँकेते ते पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापुरात काँग्रेसकडून श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांचे नाव जाहीर झाल्याने महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही का, या प्रश्‍नावर मुश्रीफ म्हणाले, ‘महायुतीतील भाजप उमेदवारांची नांवे जाहीर झाली आहेत. शिवसेना व अजित पवार गटाची भाजप नेत्यांची बैठक आज दिल्लीत होत आहे, त्यात हा तोडगा निघेल.’

Minister Hasan Mushrif
Kolhapur Loksabha : तब्बल 25 वर्षांनंतर कोल्हापुरात दिसणार 'हात'; शाहू महाराजांच्या उमेदवारीने मिळाली प्रतिष्ठा

ज्या जागा अडचणीत आहेत, त्या जाहीर झालेल्या नाहीत, असे सांगितले जाते याविषयी ते म्हणाले, ‘याबाबत मला काही माहिती नाही, ‘आप की बार ४०० पार’ एवढेच मला माहीत आहे. कुठलीही जागा धोक्यात नाही.’ मनसे प्रमुख राज ठाकरे महायुतीत येत आहेत, त्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील, असे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

Minister Hasan Mushrif
Satara LokSabha : सातारा जातीयवादी विचाराकडे कधीही जाऊ देणार नाही; काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

लोकसभा असो किंवा विधानसभा ज्यांना या निवडणुका लढवायच्या आहेत, पण त्यांना तिकीट मिळत नाही, असे लोक उड्या मारत असतात. सगळ्याच पक्षांत असे होत असते. त्यामुळे तिकडे फारसे लक्ष देण्याची गरज नसल्याचे मुश्रीफ यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com