Husain Dalwai
Husain Dalwaiesakal

Husain Dalwai : स्वतःहून राजकारणातून निवृत्त होणारा नेता; सत्तेसाठी हपापलेल्या नेत्यांसमोर घालून दिला आदर्श

हुसेन दलवाई (सीनियर) हे खेड विधानसभा मतदारसंघातून (Khed Assembly Constituency) विधानसभेवर १९६२ पासून निवडून येत होते.
Summary

आमदारकी खेडमध्ये असे त्रिस्थळी असलेले दलवाई चिपळूण ही आपली आई आहे आणि खेड ही मावशी आहे, असे सांगायचे.

Konkan Politics : महाराष्ट्राचे माजी कायदामंत्री आणि रत्नागिरीचे माजी खासदार (कै.) हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सीनियर) यांनी नव्या पिढीतील राजकारणासाठी अनेक आदर्श निर्माण केले. विशेष म्हणजे राज्यसभेतील सदस्यत्वाचा दीर्घ कालावधी शिल्लक असताना ते (Husain Dalwai) लोकसभेच्या मैदानात उतरले आणि जनतेतून खासदार झाले होते. नंतर स्वतःहून राजकारणातून निवृत्ती घेऊन पद आणि सत्तेसाठी हपापलेल्या नेत्यांसमोर आदर्श घालून दिला आहे.

हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सीनियर) हे खेड विधानसभा मतदारसंघातून (Khed Assembly Constituency) विधानसभेवर १९६२ पासून निवडून येत होते. त्यांचा जन्म चिपळूणमध्ये उक्ताड गावी झाला. कायद्याचे शिक्षणही चिपळूणमध्ये पूर्ण केले. वकिली मुंबईत, आमदारकी खेडमध्ये असे त्रिस्थळी असलेले दलवाई चिपळूण ही आपली आई आहे आणि खेड ही मावशी आहे, असे सांगायचे. दलवाई यांनी १९६२ ते १९७८ असे दीर्घकाळ विधानसभेत खेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

Husain Dalwai
Satara Lok Sabha : लोकसभेच्या रणांगणातून पवारांच्या दोस्ताची माघार; निष्ठावंतांकडून श्रीनिवास पाटलांची मनधरणी

१९७७ ते १९७८ या वर्षी ते कायदामंत्री होते. त्यांनी आमदार असताना राज्याचे तत्कालीन कामगार मंत्री नरेंद्र तिडके यांच्याकडे आग्रह धरून लोटे परशुराम ही औद्योगिक वसाहत मंजूर करून घेतली. त्यामुळे चिपळूण आणि खेड तालुक्याचा औद्योगिक विकास झाला. बहुचर्चित नातूवाडी जलप्रकल्प मंजूर केला. खेड तालुक्यातील अनेक लघु आणि मध्यम धरणे दलवाई यांनी मंजूर केली. मे १९८४ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली आणि राज्यसभा सदस्यत्वाचा साडेपाच वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांना डिसेंबर १९८४ मध्ये लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह केला आणि त्या निवडणुकीत ते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.

Husain Dalwai
Hatkanangale Lok Sabha : ..तर मैदानात घेऊन लोळवल्याशिवाय राहणार नाही; राजू शेट्टींचा थेट इशारा

आणीबाणीच्या काळात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मोठा उठाव झाला. त्यासाठीच्या सर्व बैठका दलवाई यांच्या मुंबईतील ओव्हल मैदानासमोरच्या एम्प्रेस कोर्ट या निवासस्थानी होत होत्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते तेथे एकत्र येत होते. त्यानंतरच्या काळात शंकरराव चव्हाण यांच्या जागी वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात दलवाई यांना मंत्री केले. त्यानंतर बॅ. अ. र. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याचेही विभाजन झाले. त्या वेळी हुसेन दलवाई राज्यसभेवर निवडून गेले. निवृत्तीनंतर २५ वर्षे ते राजकारणापासून दूर राहून सामान्य जीवन जगत होते. मे २०२० मध्ये त्यांचे निधन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com