Kolhapur Lok Sabha Eknath Shinde Mahadevrao Mahadik
Kolhapur Lok Sabha Eknath Shinde Mahadevrao Mahadikesakal

'तुमच्यात चमत्कार करण्याची क्षमता, त्यामुळं तुमची ताकद महायुतीच्या मागं लावा'; मुख्यमंत्र्यांचे महाडिकांना आवाहन

‘आम्ही तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत, या जिल्ह्यात तुमचा शब्द पाळणारा मोठा वर्ग आहे.'
Summary

महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) व धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात आले होते.

कोल्हापूर : ‘जिल्ह्यात तुमच्या शब्दाला मान आहे, लोक तुमचा शब्द पाळतात, तुमच्यात चमत्कार करण्याची क्षमता आहे, त्यामुळे तुमची ताकद जिल्ह्यातील महायुतीच्या मागे लावा’, अशी साद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांना घातली.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्पूर्वी नागाळा पार्क येथील ‘शाहू’ ग्रुपचे अध्यक्ष व भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांच्याही निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) व धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापुरात आले होते. दुपारी अर्ज भरून झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा घाटगे यांच्या निवासस्थानी भेट दिली.

Kolhapur Lok Sabha Eknath Shinde Mahadevrao Mahadik
भाजपकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच उदयनराजेंनी भरली अनामत रक्कम; 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता

त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी शिरोली पुलाची येथील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. ‘आम्ही तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत, या जिल्ह्यात तुमचा शब्द पाळणारा मोठा वर्ग आहे. तुमच्यात चमत्कार करण्याची क्षमता असून जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील यासाठी तुमची ताकद पणाला लावा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी श्री. महाडिक यांना सांगितले. सुमारे दोन तासांहून अधिक काळ शिंदे हे महाडिक यांच्या निवासस्थानी थांबून होते.

Kolhapur Lok Sabha Eknath Shinde Mahadevrao Mahadik
Hatkanangale Lok Sabha : ..अखेर आमदार प्रकाश आवाडेंची तलवार म्यान; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मानेंना जाहीर केला पाठिंबा

साडेपाचच्या सुमारास श्री. महाडिक यांच्या निवासस्थानातून ते विमानतळावर दाखल झाले. तेथून ते विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले. या वेळी शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, माजी मंत्री विजय शिवतारे, रामदार कदम, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com