South Maharashtra
South Maharashtraesakal

दक्षिण महाराष्ट्रातून 'घड्याळ' गायब! बालेकिल्ल्यातच नाही चिन्ह; राष्ट्रवादी फुटीनंतर कोल्हापूर, सांगली, साताराचे चित्र

काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडल्यानंतर पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
Summary

१९९९ ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर दोन्ही काँग्रेसने लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवली होती. त्यावेळी सांगलीतून माजी मंत्री दिवंगत मदन पाटील हे राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर रिंगणात उतरले होते.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) फुटीनंतर दक्षिण महाराष्ट्रातील (South Maharashtra) कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतून लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह ‘घड्याळ’ (Clock Symbol) गायब झाले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर हे तिन्ही जिल्हे पक्षाचे बालेकिल्ले होते, पक्ष फुटीनंतर मात्र पक्षाचे चिन्ह नसल्याने नव्या चिन्हासह खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला मिळालेले ‘तुतारी’ चिन्ह लोकांपर्यंत पोहचवण्याचे आव्हान असेल.

South Maharashtra
Kolhapur Lok Sabha : 'कोल्हापुरात आज मी नव्हे, तर रयतेनेच माझा उमेदवारी अर्ज दाखल केला'; शाहू महाराजांना विजयाचा विश्वास

काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडल्यानंतर पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. नव्या पक्षाची मुहूर्तमेढ कोल्हापुरात रोवली गेली आणि त्यावर सातारा जिल्ह्यात कळस चढवण्यात आला. त्यानंतर कोल्हापूर (Kolhapur) व सातारा या दोन्ही जिल्ह्यांनी सातत्याने पवार यांच्या राष्ट्रवादीला साथ दिली. सातारा जिल्ह्यात तर लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या दहा अशा बारापैकी ११ जागांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते.

कोल्हापुरात लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या १२ पैकी लोकसभेच्या दोन्ही, तर विधानसभेच्या चार जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला होता. गेल्यावर्षी जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन खासदार आणि ४० आमदारांसह पक्षातून बाहेर पडले. या जोरावर त्यांना पक्षाचे अधिकृत ‘घड्याळ’ चिन्हही मिळाले. अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभाग मिळवला; पण लोकसभेच्या निवडणुकीत पुणे वगळता सातारा, कोल्हापूर व सांगली या एकेकाळी राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असलेल्या जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही.

South Maharashtra
Jayant Patil : भाजपला '400 पार' राहू देत '200 पार' होताना नाकीनऊ येईल; आमदार जयंत पाटलांनी लगावला टोला

परिणामी या तीन जिल्ह्यांतून पक्षाचे ‘घड्याळ’ हे चिन्ह गायब झाले. सद्या पुणे जिल्ह्यातील शिरूर, बारामती अशा दोनच ठिकाणी ‘घड्याळ’ चिन्हासह राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर व हातकणंगले असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. कोल्हापुरातून १९९९, २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर दिवंगत सदाशिवराव मंडलिक विजयी झाले. २००९ मध्ये मंडलिक हेच अपक्ष विजयी झाले, तर २०१४ मध्ये पुन्हा ‘घड्याळ’ चिन्हावर खासदार धनंजय महाडिक विजयी झाले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांनी महाडिक यांचा पराभव केला. हातकणंगलेतून १९९९ व २००४ ला निवेदिता माने राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर विजयी झाल्या. २००९ मध्ये त्यांचा पराभव झाला. आता या दोन्ही जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाला गेल्याने या मतदारसंघातही ‘घड्याळ’ दिसणार नाही.

१९९९ ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर दोन्ही काँग्रेसने लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवली होती. त्यावेळी सांगलीतून माजी मंत्री दिवंगत मदन पाटील हे राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर रिंगणात उतरले होते; पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतरच्या सर्वच निवडणुका दोन्ही काँग्रेसनी एकत्रित लढवल्याने सांगलीची जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही, त्या ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व होते. आता सलग दोन वेळा या मतदारसंघातून भाजपचे संजय पाटील खासदार आहेत. पूर्वी पाटील हे राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांचे कट्टर समर्थक होते; पण जागा पक्षाला मिळणार नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपची वाट धरली.

South Maharashtra
PM मोदी देशाला वाहून घेतलेलं त्यागी व्यक्तिमत्त्‍व, तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्यासाठी साथ द्या : नारायण राणे

दक्षिण महाराष्ट्रातील ‘घड्याळ’ची वाटचाल

  • कोल्हापूर : १९९९, २००४ - दिवंगत सदाशिवराव मंडलिक (विजयी), २०१४- धनंजय महाडिक (विजयी)

  • सांगली : १९९९- दिवंगत मदन पाटील (पराभूत)

  • साताराः १९९९, २००४- लक्ष्मणराव पाटील (विजयी), २००९, २०१४, २०१९-उदयनराजे छत्रपती (विजयी), २०१९ च्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील (विजयी)

  • कराड - १९९९, २००४- श्रीनिवास पाटील विजयी

  • माढा - (२००९ च्या पुनर्रचनेनंतर निर्माण झालेला मतदारसंघ) : २००९ - खासदार शरद पवार (विजयी), २००९ - विजयसिंह मोहिते-पाटील (विजयी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com