Kolhapur Lok Sabha Shrikant Shinde
Kolhapur Lok Sabha Shrikant Shindeesakal

'सर्व मित्रपक्षांची ताकद मजबूत, कोल्हापुरात लोकसभेला 2-0 असा गोल होईल'; खासदार शिंदेंना विश्वास

'आदित्य ठाकरे मृगजळातून बाहेर आले नाहीत. दोन वर्षांपासून ते शिव्याशाप देत आहेत.'
Summary

''कल्याणाचे नागरिक मला मोठ्या संख्येने निवडून देतील, असा विश्‍वास आहे. कल्याणमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेतली तर आम्हाला आनंद होईल.''

कोल्हापूर : ‘प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांनी केले आहे. विकासाच्या मुद्यावरून आम्ही मत मागत आहोत. आमच्या सर्व मित्रपक्षांची ताकद मजबूत आहे. त्यामुळे जिल्ह्यात २-० असा गोल होईल’, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आज येथे व्यक्त केला. याचवेळी त्यांनी फुटबॉलच्या स्टेडियमचे (Football Stadium) काम लवकरात लवकर सुरू होईल, जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही जाहीर केले.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयात खासदार शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यासह राज्यातील संदर्भ देऊन बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचेही कोल्हापूरवर प्रेम आहे. जिल्ह्यात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Kolhapur Lok Sabha Shrikant Shinde
Sangli Lok Sabha : 'संविधान रक्षणाच्या लढाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वसंतदादांच्या नातवाच्या पाठीशी उभे'

मुख्यमंत्री निवडणुकीसाठी जो प्रचार करावा लागतो ते करतात. त्यामुळे ते येथे थांबून भेटीगाठी घेतात. त्यांचे हे प्रेम निवडणुकीपुरते नाही तर त्यांनी विकासासाठीही निधी दिला आहे. कोल्हापुरात भावनिक आवाहन करून मते मागितली जाती; पण, नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावे. केंद्रात पुन्हा ‘एनडीए’ सरकार येईल. त्यामुळे जे सत्तेत राहणार त्या उमेदवाराला निवडून द्या, असेही आवाहन केले.

खासदार शिंदे पुढे म्हणाले, ‘आदित्य ठाकरे मृगजळातून बाहेर आले नाहीत. दोन वर्षांपासून ते शिव्याशाप देत आहेत. पण, लोकांना माहिती आहे, कोण कामाचे आहे. आदित्य ठाकरे बोलतात ते स्वतःसाठी बोलतात. पण, मुख्यमंत्री शिंदे जनतेसाठी काम करतात हे सर्वांना कळले आहे. कल्याणमध्ये त्यांचा रोड शो झाला. तरीही तेथे आम्हीच जिंकणार आहोत. निवडणूक आहे म्हटल्यावर रोड शो सगळे करणार, त्यात नवीन काही नाही.

Kolhapur Lok Sabha Shrikant Shinde
Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

कल्याणाचे नागरिक मला मोठ्या संख्येने निवडून देतील, असा विश्‍वास आहे. कल्याणमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेतली तर आम्हाला आनंद होईल. कल्याणमध्ये मनसेची ताकद मोठी आहे. आम्ही राज ठाकरेंना सभेसाठी विनंती करणार आहे. ठाणे, पालघर, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर येथे महायुतीचे उमेदवार निवडून येतील. या सगळ्या जागांवरील उमेदवारांच्या नावांची उद्या घोषणा होईल.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com