Devendra Fadnavis Kolhapur Lok Sabha
Devendra Fadnavis Kolhapur Lok Sabhaesakal

मंडलिकांना निवडून दिलात तर कोल्हापूरची बोगी थेट मोदींच्या इंजिनला जोडली जाईल - देवेंद्र फडणवीस

आताच्या घडीला देशाचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतील.
Summary

'लोकसभेचे (Kolhapur Lok Sabha) उमेदवार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना मत म्हणजे मोदींना मत याची खात्री बाळगा.'

चंदगड : महाविकास आघाडीमध्ये २६ पक्षांची खिचडी झाली आहे. प्रत्येकजण आपणच नेता म्हणवतो. आमच्या महायुतीमध्ये मात्र पंतप्रधान मोदी यांचे एकमुखी नेतृत्व आहे. महायुतीच्या या विकासाच्या गाडीला मोदींचे मजबूत इंजिन आहे. त्यामुळे या विभागाचे लोकसभेचे (Kolhapur Lok Sabha) उमेदवार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना मत म्हणजे मोदींना मत याची खात्री बाळगा. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मंडलिकांना निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

Devendra Fadnavis Kolhapur Lok Sabha
सांगलीत 'वंचित'चा तिसऱ्यांदा 'यू-टर्न'! शेंडगेंना केलं 'एप्रिल फूल', विशाल पाटलांना दिला पाठिंबा; आंबेडकरांच्या बदलत्या भूमिकेची चर्चा

इनाम सावर्डे (ता. चंदगड) येथे मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) प्रमुख उपस्थित होते. या विभागातून मंडलिक यांना निवडून दिलात तर कोल्हापूरची बोगी थेट मोदींच्या इंजिनला जोडली जाईल आणि मग विकास कामे कोणीही थांबवू शकणार नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी विश्वास दिला. या विभागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, साखर कारखानदारी, काजू प्रक्रिया उद्योग यांना सहकार्याची भूमिका घेतली आहे. भविष्यात या विभागासाठी नवीन औद्योगिक वसाहत तसेच इतर सर्वच विकासकामे मार्गी लावू, असे आश्वासन दिले.

Devendra Fadnavis Kolhapur Lok Sabha
केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी शिवसेना का सोडली? बाळासाहेब ठाकरेंचा दाखला देत स्वत:च सांगितलं 'हे' कारण

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘विधानसभेला काय व्हायचे ते होईल. परंतु, आताच्या घडीला देशाचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतील. मंडलिक यांना निवडून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल.’ उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, समरजितसिंह घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राहुल देसाई यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com