Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

देशाचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात २०१९पेक्षा यंदा एक लाख १४ हजार ७६१ ने मतदान केलेल्यांची संख्या वाढली आहे. ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात पडणार? यावरून खासदार कोण होणार हे चार जूनला ठरणार आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal

पुणे : देशाचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात २०१९पेक्षा यंदा एक लाख १४ हजार ७६१ ने मतदान केलेल्यांची संख्या वाढली आहे. ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात पडणार? यावरून खासदार कोण होणार हे चार जूनला ठरणार आहे.

बारामती मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. ७) मतदान झाले. मतदानाची अंतिम टक्केवारी निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केली. त्यानुसार लोकसभा मतदारसंघात ५९.५० टक्के मतदान झाले आहे. २०१९मध्ये या मतदारसंघात ६१.७ टक्के मतदान झाले होते. गतवेळेपेक्षा यंदा दीड ते पावणे दोन टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे.

परंतु एक लाख १४ हजार ७६१ने मतदान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २०१९मध्ये १२ लाख ९६ हजार ८६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. यावर्षी संख्या १४ लाख ११ हजार ६२१ पर्यंत वाढली आहे. त्यामध्ये सात लाख ७४ हजार ३८३ म्हणजे ६२.३५ टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले; तर सहा लाख ३७ हजार २१९ म्हणजे ५६.३६ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये प्रमुख पक्षाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे. तरही महिला मतदारांच्या मतदानाचा टक्का पुरुष मतदारांपेक्षा कमीच असल्याचे दिसून आले.

मतदानाची टक्केवारी

मतदारसंघ २०१९ २०२४

दौंड ६४.०५ ६०.२९

इंदापूर ६४.३९ ६७.१२

बारामती ७०.२४ ६९.४८

पुरंदर ६०.४८ ५३.९६

भोर ६०.८४ ६०.११

खडकवासला ५३.२० ५१.५५

एकूण ६१.५४ ५९.५०

विधानसभानिहाय मतदानाची आकडेवारी

विधानसभा पुरुष महिला एकूण टक्केवारी

मतदारसंघ मतदान

दौंड १,०२,३८१ ८१,२७७ १,८३,६५८ ६०.२९

इंदापूर १,१८,४०७ ९८,७६१ २,१७,१७३ ६७.१२

बारामती १,३८,१२७ १,१८,३९८ २,५६,५३१ ६९.४८

पुरंदर १,२८,५२९ १,०३,१४८ २,३१,६७९ ५३.९६

भोर १,३५,८४४ १,०९,३७० २,४५,२१५ ६०.११

खडकवासला १,५१,०९५ १,२६,२६५ २,७७,३६५ ५१.५५

खडकवासल्यात महिलांचे सर्वाधिक मतदान...

बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यापैकी दौंड विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांचे मतदान कमी झाले आहे; तर सर्वाधिक महिलांचे मतदान खडकवासला विधानसभा मतदारसंघात झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com