Uddhav Thackeray : मोदींना महाराष्ट्र दिल्ली पाहू देणार नाही! ; उद्धव ठाकरे यांचा घणाघात,आता वानप्रस्थाश्रमात जा

‘‘महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग हिरावून तुम्ही गुजरातला नेले. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. आता आम्हाला नकली सेना म्हणता, नकली संतान म्हणता, तुम्हाला आता इंगा दाखवितो. मोदीजी हा महाराष्ट्र तुम्हाला पुन्हा दिल्ली पाहू देणार नाही.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sakal

छत्रपती संभाजीनगर : ‘‘महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग हिरावून तुम्ही गुजरातला नेले. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. आता आम्हाला नकली सेना म्हणता, नकली संतान म्हणता, तुम्हाला आता इंगा दाखवितो. मोदीजी हा महाराष्ट्र तुम्हाला पुन्हा दिल्ली पाहू देणार नाही. आता तुम्ही वानप्रस्थाश्रमात जा’’, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. १०) केला.

महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली. यावेळी ते म्हणाले, ‘‘आमच्या शिवसेनेला सतत नकली शिवसेना म्हणून पंतप्रधान मोदी सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणत आहेत, काय निर्णय द्यायचा हे सांगत आहेत. महाराष्ट्रातील चेल्या चपाट्यांना, आत्ताच्या पाव उपमुख्यमंत्र्यांना पुढे करून माझ्या पक्षात गद्दारीची बीज रोवली. नंतर राष्ट्रवादी पक्ष फोडला. तरीदेखील कधी मला डोळा मारत आहेत तर कधी शरद पवारांना. ते घाबरले आहेत. महाराष्ट्र तुम्हाला आता पुन्हा दिल्ली बघू देणार नाही’’, असे ठाकरे म्हणाले. विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार उदयसिंग राजपूत, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींची उपस्थिती होती.

२०१९ लाच युती तोडणार होतो

मोदींना पंतप्रधान करण्यासाठी २०१४ साली आणि २०१९ सालीही त्यांनी माझी सही घेतली. तेच आता नकली म्हणत आहेत. २०१४ साली आमच्यासोबतची युती तोडली. २०१९ साली आम्हीच यांच्यासोबतची युती तोडणार होतो. पण, हिंदुत्वामुळे आम्ही युती कायम ठेवली, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Narendra Modi : पवार, ठाकरे यांनी ‘एनडीए’त यावे ; नंदुरबारमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ऑफर

भुमरेंना माळ्यावरून फेकायचे का ?

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यावर टीका करताना भुमरेंनी दोन वर्षांत जिल्ह्यात १४ दारू दुकाने उघडली. भुमरेंनी याच मैदानावर ‘उद्धव ठाकरे यांनी सातव्या माळ्यावरून उडी मारायला सांगितली तर मारू,’ असे म्हटले होते. आता त्यांना सातव्या माळ्यावरून खाली फेकायचे का? असा प्रश्‍न केला. निवडून आल्यास जिल्ह्यात देशी दारू बंदी करू, असे खैरे यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com