PM Modi Pilibhit Rally : पीलीभीतमधील मोदींच्या सभेला वरुण गांधी अनुपस्थित; नेमकं राजकारण काय?

मोदींच्या मंचावर वरुण गांधी अनुपस्थित होते. याबाबत फारकाही आश्चर्य व्यक्त करण्यात येत नसलं तरी त्यांचं राजकीय भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार वरुण गांधी हे आजारी असल्यामुळे सभेला येऊ शकले नाहीत.
PM Modi Pilibhit Rally
PM Modi Pilibhit Rally esakal

Loksabha election 2024 : पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून भाजपने वरुण गांधी यांचं तिकीट कापून जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. जितिन प्रसाद हे योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे गांधी नाराज असल्याचं दिसून येत असून ते मोदींच्या सभेला उपस्थित नव्हते.

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये वरुण गांधींचं नाव नव्हतं. त्यानंतर त्यांनी मतदारांना उद्देशून एक चिठ्ठी लिहिली होती. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचं आयोजन पीलीभीतमध्ये करण्यात आलेलं होतं. परंतु या सभेला वरुण गांधी दिसले नाहीत. दुसरीकडे भाजपने मेनका गांधी यांना सुल्तानपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

पीलीभीतमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पीलीभीतल्या धरतीवर माता यशवंतरी देवीचा आशीर्वाद आहे. येथे आदी गंगामाता गोमतीचं उगमस्थान आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी देशाला हे सांगतो की, इंडी आघाडीने शक्तीला संपवण्याची शपथ घेतली आहे. आज देशामध्ये त्या शक्तीची पूजा होतेय, आजपासून चैत्र नवरात्री सुरु झाली आहे, देशभरात शक्तीची उपासना सुरु आहे, प्रत्येकजण भक्तीमध्ये तल्लीन आहे, शक्ती उपासना सुरु आहे. तीच शक्ती संपवण्याचा इंडी आघाडीचा डाव आहे.

PM Modi Pilibhit Rally
Onion Export: शेतकऱ्यांचा संताप! आपला 15 रुपयांचा कांदा दुबईत 120 रुपयांना; दलाल मालामाल

दरम्यान, मोदींच्या मंचावर वरुण गांधी अनुपस्थित होते. याबाबत फारकाही आश्चर्य व्यक्त करण्यात येत नसलं तरी त्यांचं राजकीय भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार वरुण गांधी आजारी असल्यामुळे सभेला येऊ शकले नाहीत.

मोदींची रॅली बरेली, शाहजहानपूर, बदाऊन, लखीमपूर आणि धौराहारासारख्या भागांमध्ये प्रभाव पडावा, यासाठी आयोजित केली होती. पीलीभीत येथील सभा बरेली किंवा लखीमपूर खेरीमध्ये आयोजित करण्यात येणार होती.

PM Modi Pilibhit Rally
Hottest Month: गेल्या 10 महिन्यांत मार्च ठरला सर्वात उष्ण महिना; काय आहे तापमान वाढीचे कारण

परंतु काही ठिकाणांमध्ये नेत्यांची नाराजी आणि कुठे लोकांची नेत्यांवर नाराजी असल्याने पीलीभीमध्ये रॅली आयोजित करण्यात आलेली होती. नाराज नेत्यांमध्ये संतोष गंगवार यांचाही समावेश असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार कळतंय. तरीही संतोष गंगवार हे मंचावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com