Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

''माझ्या जीवनातल्या सगळ्या निवडणुका मी शिवसेनेकडून लढलेलो आहे. पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा बाळासाहेबांना भेटलो होतो. तेव्हा ते म्हणाले होते, आता शिवसेनेची ताकद तुझ्यामागे आहे. कुठला सिंह आला तरी फरक पडत नाही. ती ऊर्जा आजही माझ्यासोबत आहे.''
Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

Omprakash Rajenimbalkar : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर 'सकाळ'शी संवाद साधला. सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस यांनी 'शांतता राजकारण चालू आहे' या सदरात 'सकाळ'च्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी ओमराजे यांची मुलाखत घेतली.

यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील लढत ही घराण्यातील लढाई नाही तर धर्म विरुद्ध अधर्माची लढाई आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. त्यामुळे काम करणाऱ्या माणसाला जनता साथ देईल, यात संशय नाही.

खासदार निंबाळकर पुढे म्हणाले की, माझ्या वडिलांचा बळी गेला, कारण ताकदीचा विरोधक नको होता. त्यामुळे मी जिद्दीने राजकारणात काम करत पुढे आलो आणि इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. माझ्याकडे पैसा नव्हता, ताकद नव्हती, केवळ वडिलांच्या कामाची शिदोरी होती. काही लोक पाच वर्षे काहीच काम करत नाहीत. सामान्य लोकांना गरीब ठेवून पुन्हा निवडणुकीत त्यांना पैसे देऊन निवडून येतात आणि पुन्हा पैसा कमावतात.

''माझ्या पाच वर्षांच्या कालखंडात मी थेट जनतेशी कनेक्ट होतो. माझा फोन नंबर तहसील, दवाखाना, एमएसईबीच्या बाहेर आहे. त्यामुळे थेट लोकं मला फोन करतात. शेतकऱ्याचा फेर ओढण्यापासून ते दवाखान्यातील अडचणी सोडवण्यापर्यंत कामं मी करतो. पुढच्या अब्जाधीश लोकांना या कामाची किंमत कळणार नाही, ते ह्या कामाला क्षुल्लक गोष्ट समजतात. परंतु मी ही जबाबदारी समजून काम करतो.''

मी बाळासाहेबांना भेटलो तेव्हा...

ओमराजे म्हणाले की, माझ्या जीवनातल्या सगळ्या निवडणुका मी शिवसेनेकडून लढलेलो आहे. पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा बाळासाहेबांना भेटलो होतो. तेव्हा ते म्हणाले होते, आता शिवसेनेची ताकद तुझ्यामागे आहे. कुठला सिंह आला तरी फरक पडत नाही. ती ऊर्जा आजही माझ्यासोबत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना माझी कामं झाली मतदारसंघामध्ये त्यांच्यामुळे अनेक प्रश्न सुटले.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा
Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

पक्ष सोडला नाही कारण...

२०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ओमराजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. त्यावर खुलासा करताना त्यांनी सांगितलं की, शिवसेना फुटल्यानंतर सगळ्यांनाच ऑफर होत्या. ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांना पैशांचं आमिष आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना ईडीची भीती घातली होती. माझ्याकडे पैसेही नाहीत आणि पैशांचा हव्यासही नाही. गद्दारीचा डाग माझ्यावर नको म्हणून मी पक्ष सोडून गेलो नाही. आपल्याकडे काही नव्हतं म्हणून त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच आला नाही. नाहीतर वॉशिंग मशिनध्ये जावं लागलं असतं.

मोदींना विचारले प्रश्न

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. त्या अनुषंगाने बोलताना ओमराजेंनी पंतप्रधानांना प्रश्न उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो असं मोदीजी म्हणाले होते, त्याचं काय झालं?

पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो म्हणाले होते, प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार होते.. त्याचं काय झालं? एवढं नाही तर वेदांतासारखा प्रोजेक्ट राज्यात आला असता तर माझ्या भागातल्या दोन लाख जणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या.. ना खाऊंगा-ना खाने दुंगा, असं ते म्हणाले होते परंतु भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्यावरचे आरोप धुतले जात आहेत, त्याचं काय? असे प्रश्न ओमराजेंनी उपस्थित केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com