esakal | Loksabha 2019 : नेहरुंचा पुतळा नसणे म्हणजे त्यांचा अनादर नाही : पंतप्रधान
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha 2019 : नेहरुंचा पुतळा नसणे म्हणजे त्यांचा अनादर नाही : पंतप्रधान

- पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा नसणे म्हणजे त्यांचा अनादर नाही

Loksabha 2019 : नेहरुंचा पुतळा नसणे म्हणजे त्यांचा अनादर नाही : पंतप्रधान

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पुतळा यांचा भलामोठा पुतळा असणे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा नसणे म्हणजे हा नेहरू यांचा अनादर नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) सांगितले.

गुजरातच्या अमरेली येथे आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, जेव्हा आपण गुगलवर जगातील सर्वांत उंच पुतळा कुठं आणि कोणत्या राज्यात आहे, असे गुगलवर सर्च केल्यास काय दिसते. तेव्हा गुजरातचेच नाव येते. जगातील सर्वांत मोठ्या उंचीचा पुतळा असणे ही गुजरातसाठी अभिमानाची बाब आहे. तसेच सरदार पटेल यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात उपपंतप्रधान म्हणूनही काम पाहिला आहे.

दरम्यान, सरदार वल्लभभाई यांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून विरोधकांकडून अनेकदा पंतप्रधान मोदींवर टीका केली जात आहे. त्यानंतर मोदींनी याबाबत वक्तव्य केले आहे. 

loading image
go to top