#ResultsWithSakal अच्छे दिन आ गए : धर्मेंद्र

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मे 2019

हेमा, अभिनंदन... आमचे भारत मातेवर प्रेम आहे. हे आपण बिकानेर व मथुरामध्ये सिद्ध करून दाखवले आहे. आपण आपल्या भारताला नेहमी यशाच्या शिखरावर घेऊन जाणार.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीसाठी मथुरा येथून हेमा मालिनी आणि गुरूदासपूरमधून सनी देओल विजयाच्या मार्गावर आहेत. हेमा मालिनी व सनी देओल यांचे समर्थक सोशल मीडियावरून शुभेच्छा देत आहेत. शिवाय, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीदेखील ट्विटरवर पत्नी व मुलाचे अभिनंदन केले आहे.

धर्मेंद्र यांनी पत्नी हेमा मालिनी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे छायाचित्र शेअर करताना लिहिले की, 'हेमा, अभिनंदन... आमचे भारत मातेवर प्रेम आहे. हे आपण बिकानेर व मथुरामध्ये सिद्ध करून दाखवले आहे. आपण आपल्या भारताला नेहमी यशाच्या शिखरावर घेऊन जाणार.' दुसऱ्या ट्विटमध्ये मुलगा सनी देओलचे अभिनंदन करीत म्हटले की, 'फकीर बादशाह मोदी जी, भूमी पुत्र सनी देओल, अभिनंदन. अच्छे दिन आ गए.'

धर्मेंद्र यांच्यासोबत ईशा देओलने आई हेमा मालिनी आणि भाऊ सनी देओलच्या विजयाचे अभिनंदन केले आहे. ईशाने ट्विट केले की, 'अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, हेमा मालिनी व सनी देओल. यशाचे खूप कौतूक आहे. काय विजय मिळवलाय.'

प्रसारमाध्यमांशी बोलताना सनी देओल म्हणाले, 'मला आनंद आहे की मोदींचा विजय होतो आहे. मला या गोष्टीचाही आनंद आहे की मीदेखील विजयी होतो आहे. आता फक्त माझे एकच उद्देश आहे की मला विजय मिळाला आहे तर त्या बदल्यात मी काम करेल. आपल्या क्षेत्राला आणखीन चांगले बनवू शकू. ही माझी जबाबदारी आहे. लोकांनी मला जे प्रेम दिले त्यासाठी मी खूप खूश आहे. इथे मी कोणत्या हेतूने आलेलो नव्हतो, फक्त काम करीत राहिन. विजयी होतोय, यासाठी खूश आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood actor dharmendra congratulate hema malini and sunny deol on loksabha win