Loksabha 2019 : काँग्रेसमध्ये फक्त तेवढ्यासाठी प्रवेश केलेला नाही: उर्मिला

वृत्तसंस्था
बुधवार, 27 मार्च 2019

बॉलिव़ू़डमधून अनेक कलाकार राजकारणात प्रवेश करतात. तुम्ही माझ्या काँग्रेस प्रवेशाकडे त्याच दृष्टीकोनातून पाहू नका. मी निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही.

नवी दिल्लीः माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव होता. आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्वाच्या गोष्टी मिळाल्या असून, फक्त निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर म्हणाली.

उर्मिला मातोंडकर यांनी आज (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर यांना निवडणूक लढविण्याची विनंती केली होती. त्यांना पक्षात सहभागी करून घेण्यासाठी संजय निरुपम यांच्यासह त्या आज सकाळी दिल्लीला रवाना झाल्या. राहुल गांधींच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. उत्तर मुंबई मतदारसंघातून गोपाळ शेट्टी हे भाजपचे उमेदवार आहेत.

उर्मिला म्हणाली, माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, 'मी, अशा कुटुंबात वाढले की पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा कुटुंबावर प्रभाव होता. आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्वाच्या गोष्टी मिळाल्या आहेत. मी आज सक्रीय राजकारणात प्रवेश करत आहे. बॉलिव़ू़डमधून अनेक कलाकार राजकारणात प्रवेश करतात. तुम्ही माझ्या काँग्रेस प्रवेशाकडे त्याच दृष्टीकोनातून पाहू नका. मी निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. निवडणुकीनंतरही मी काँग्रेससोबतच असणार आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood actress urmila mantondkar join congress because