Loksabha 2019: चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मे 2019

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज बांधण्यात येत आहेत.

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता.06) पार पडले. मात्र, मतदानाचे सगळे टप्पे पूर्ण होण्याआधी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज बांधण्यात येत आहेत.

राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यामध्ये जवळपास 10 ते 15 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या भेटीत निवडणुकांनंतरच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, निवडणुक निकालापूर्वी दिल्लीत 21 मे रोजी विरोधी पक्षांची एक महत्त्वपूर्ण बैठक होत असूनृ या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चंद्राबाबू यांनी राहुल गांधींची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrababu naidu meets congress President rahul gandhi in delhi