Loksabha Results : आंध्रप्रदेशात चंद्राबाबू नायडूंना मोठा धक्का; लोकसभा आणि विधानसभेत सपाटून मार

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मे 2019

केंद्रात तिसऱ्या आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या चार दिवसआधी विरोधी पक्षांची मोट बांधणारे लोकसभआ निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये टीडीपीला 25 पैकी एकाच जागेवर आणि विधानसभेच्या 175 जागांपैकी टीडीपीला केवळ 29 जागांवर आघाडी मिळताना दिसत असून लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही चंद्राबाबूंना सपाटून मार खावा लागल्यानं त्यांचं मुख्यमंत्रीपदही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसभा निकाल 2019 :
हैद्राबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेशमध्ये मोठा धक्का बसताना दिसत आहे.

केंद्रात तिसऱ्या आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या चार दिवसआधी विरोधी पक्षांची मोट बांधणारे लोकसभआ निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये टीडीपीला 25 पैकी एकाच जागेवर आणि विधानसभेच्या 175 जागांपैकी टीडीपीला केवळ 29 जागांवर आघाडी मिळताना दिसत असून लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही चंद्राबाबूंना सपाटून मार खावा लागल्यानं त्यांचं मुख्यमंत्रीपदही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आंध्रात जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस क्लिन स्वीप करताना दिसत आहे. वायएसआर काँग्रेस विधानसभेच्या 147 जागांवर आघाडीवर असून राज्यात वायएसआर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrababu Naidu trails behind in AndhraPradesh for Loksabha 2019