अडवानींकडून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन!

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मे 2019

लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ऐतिहसीक विजयाबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांचे अभिनंदन.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीमधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

मोदींचे अभिनंदन करताना अडवानी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ऐतिहसीक विजयाबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांचे अभिनंदन. भाजप अध्यक्ष अमित शहा व सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक भाजपाचा विचार प्रत्येक मतदारापर्यंत पोहचवण्यासाठी झोकून देऊन काम केल्याने, पक्षाला एवढे मोठे यश मिळाले आहे.'

अडवानी यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'भारतासारख्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या देशात मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. देशात आज आनंदाचे वातावरण आहे. आमच्या महान राष्ट्राला पुढे उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद द्या.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congratulations to Narendra Modi for steering BJP towards this unprecedented victory says LK Advani