Election Results : देशातील 13 राज्यातून काँग्रेस नामशेष

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मे 2019

देशातील जनतेने पुन्हा भाजपला कौल दिला आहे. काँग्रेसला देशातील 13 राज्यांमध्ये एकही जागा मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवार) सकाळी सुरु झाली असून, अंतिम निकाल हाती आलेला नाही. हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशातील 13 राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

देशातील जनतेने पुन्हा भाजपला कौल दिला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एनडीएला 340 पेक्षा जास्त जागांवर आघाडी असल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि मित्रपक्षांना 90 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज आहे. मात्र, काँग्रेसला देशातील 13 राज्यांमध्ये एकही जागा मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.

काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. राजस्थानमधील 25 पैकी एकाही जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला नाही किंवा आघाडीवर नाही. गुजरातमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. शिवाय, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मणिपूर, मिझोरम, दिल्ली, ओदिशा, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड या राज्यांमध्येही काँग्रेसला एकही जागा मिळत नसल्याचे दिसत आहे.

काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये काँग्रेस फक्त 2 जागांवर आघाडीवर आहे. मध्यप्रदेशमध्ये एका जागेवर काँगेसचा उमेदवार आघाडीवर आहे. पंजाबमध्ये सध्या 8 जागांवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे. महाराष्ट्रात काँग्रेस केवळ एका जागेवर आघाडीवर आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नांदेड मतदारसंघात पराभव झाला आहे.

लोकसभा निवडणूक निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress may get zero loksabha seats in 13 states