Loksabha 2019 : 'कॅनडाचा नागरिक युद्धनौकेवर चालतो?'

congress slams pm narendra modi with photos of akshay kumar on ins sumitra
congress slams pm narendra modi with photos of akshay kumar on ins sumitra

नवी दिल्ली: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांचे कुटुंबीय तसेच इटालियन सासूरवाडीची मंडळी यांच्यासह भारतीय युद्धनौका आयएनएस विराटचा सुटीसाठी वापर केला होता, असा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काँग्रेसनेही कॅनडाचा नागरिक युद्धनौकेवर चालतो? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले होते की, 'या मंडळींनी जनपथाचे रूपांतर दलाल पथात केले. कात्रोची मामा, मिशेल मामा (ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर सौदा), अँडरसन मामा (भोपाळ वायू गळती) यांना येथूनच मदत करण्यात आली. ही सर्व माहिती आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्यांना त्रास होतो आणि मला शिव्या दिल्या जाऊ लागतात; पण लोकांना ही माहिती कळली पाहिजे. संरक्षण सौद्यांमध्ये दलाली खाण्याच्या आरोपाचाही पुनरुच्चार केला. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आयएनएस विराटचा वापर टॅक्सीसारखा केला. शिवाय, कौटुंबिक मजेसाठी गांधी कुटुंबाने राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ केल्याची टीका केली.'

मोदींच्या विधानामुळे भाजप-काँग्रेसमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. राजीव गांधींनी सुट्टीसाठी आयएनएस विराटचा वापर केला, असा दावा करणाऱ्या मोदींना आता काँग्रेसचा सोशल मीडिया विभाग सांभाळणाऱ्या दिव्या स्पंदना यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अभिनेता अक्षय कुमारचे आयएनएस सुमित्रावरील फोटो ट्विट करत कॅनडाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान मोदी आयएनएस सुमित्रावर घेऊन गेले होते. ते कसे काय चालते? यासोबतच त्यांनी सबसे बडा झूठा मोदी, असा हॅशटॅग वापरला आहे.

अक्षयकुमारकडे असलेल्या कॅनडाच्या नागरिकत्वावरुन वाद सुरू आहे. हाच संदर्भ देत दिव्या स्पंदना यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. स्पंदना यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एका लेखाची लिंक दिली आहे. '2016 मध्ये विशाखापट्टणममध्ये इंटरनॅशनल फ्लिट रिव्ह्यूला (आयएफआर) अक्षय कुमार त्याच्या कुटुंबासह उपस्थित होता. एवढेच नव्हे, तर अक्षयकुमारने नौदलाच्या अधिकारी आणि इतर पाहुण्यांसोबत सुमित्रा जहाज चालवले,' अशी माहिती स्पंदना यांनी ट्विट केलेल्या लेखात आहे.

दरम्यान, मोदींनी केलेला दावा ऍडमिरल रामदास यांनी खोटा असल्याचे सांगून ते म्हणाले, 'राजीव गांधी सुट्टीवर नव्हते, तो त्यांचा अधिकृत दौरा होता आणि त्यावेळी कोणताही परदेशी नागरिक त्यांच्यासोबत नव्हता.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com