Loksabha 2019 : 'दरवाजाची बेल बंद आहे, जोरात मोदी.. मोदी.. ओरडा'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

देशभरात अनेक मोदी समर्थक आहेत. मोदींच्या प्रचारार्थ ते विविध कल्पना राबवताना दिसतात.

भोपाळः देशभरात अनेक मोदी समर्थक आहेत. मोदींच्या प्रचारार्थ ते विविध कल्पना राबवताना दिसतात. येथील चाहत्यांनी दरवाजावर एक कागद चिटकवला असून, त्यावर 'दरवाजाची बेल बंद आहे, जोरात मोदी.. मोदी.. ओरडा' असा मजकूर लिहीला आहे. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

मुरैना शहरामधील रामनगर येथील रहिवाशी भाजपचे समर्थक आहेत. या परिसरातील अनेक घरांच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराच्या डोअरबेलखाली मोदींच्या समर्थनार्थ भन्नाट पोस्टबारी केली आहे. घरांबाहेरील डोअरबेलवर  ‘डोअर बेल खराब है, कृपया दरवाजा खुलवाने के लिये मोदी-मोदी चिल्लायें’ अशी सूचना लिहिण्यात आली आहे. प्रचाराला येणाऱ्यांनी दरवाजाची बेल वाजवून त्रास देऊ नये, म्हणून आम्ही ही शक्कल लडवली आहे. रामनगर कॉलिनीमधील 100 हून अधिक घरांच्याबाहेर अशा प्रकारचे कागद चिटकवण्यात आले आहेत. आम्ही दरवाजा उघडावा असे वाटत असेल तर जोरात बेल दाबवण्याऐवजी मोदी.. मोदी.. ओरडा असे या रहिवाश्यांना सांगायचे आहे. या परिसरामधील बहुतेकजण हे भाजप समर्थक असून, या पोस्टर्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींची लोकप्रियताही दिसून येत आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशमध्ये चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 6 मे, तिसऱ्या टप्प्यातील मतदान 12 मे रोजी होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान हे 19 मो रोजी होणार आहे.

Web Title: Doorbell is not working Shout Modi Modi People Stick posters outside their house at madhya pradesh