Loksabha 2019 : मगोचा मांद्रेत अपक्ष उमेदवार; जीत आरोलकर यांना पाठींबा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

काँग्रेसला त्यांनी म्हापसा मतदारसंघातील उमेदवाराला पाठींबा दिल्याने मांद्रेतही द्यावा, अशी विनंती काँग्रेसने केली होती. मात्र मगोने ती मान्य न करता अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला आहे.

लोकसभा 2019
गोवा : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने भाजपविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. मांद्रेत त्यांनी अपक्ष उमेदवार जीत आरोलकर यांना आज पाठिंबा जाहीर केला.

काँग्रेसला त्यांनी म्हापसा मतदारसंघातील उमेदवाराला पाठींबा दिल्याने मांद्रेतही द्यावा, अशी विनंती काँग्रेसने केली होती. मात्र मगोने ती मान्य न करता अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला आहे. भाजपच्या उमेदवारांचा पराभूत हेच लक्ष्य मगोने सध्या ठेवून हे पाठींबे दिले आहेत. शिरोडा मतदारसंघात मगोचे अध्यक्ष दिपक ढवळीकर उभे राहिले असून तेथे या पभाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Web Title: Independent candidate of mago in mandre Support to Jeet Arolkar